यावल वार्ताहर (सुरेश पाटील) आठवडे बाजाराच्या दिवशी काल शुक्रवार दि.10 रोजी संध्याकाळी 18:00 वाजेच्या सुमारास यावल शहरातील सूतगिरणी जवळ फर्निचर साठी वापरले जाणारे सागवानी लाकूड
10 नग 0.110 घमी अंदाजे 65 हजार रुपये किमतीचे यावल पूर्व व पश्चिम विभागातील सहाय्यक वनसंरक्षक क्षेत्रीय कर्मचारी वनपाल वनरक्षक पोलीस नाईक वाहन चालक यांच्या मदतीने पकडण्यात आले या गुन्ह्यातील आरोपी मात्र फरार झाला आहे.
[ads id="ads2"]
वन विभागाला मिळालेल्या गुप्त माहिती वरून यावल सहा. वनसंरक्षक.पि.व्ही.हाडपे आणि यावल पुर्व,यावल पश्चिम वनक्षेत्रातील क्षेत्रीय वनकर्मचारी,वनपाल,वनरक्षक, पोलीस नाईक,वाहन चालक यांनी
यावल शहरातील सुतगिरणी परिसरात फरार आरोपी अरशद शेख यांचे मालकिचे पत्र्याचे शेडमध्ये विनापरवाना अवैध रित्या रंधामशिन,लाकूड चिरकाम करण्याचे आणि फर्निचर तयार करण्यासाठी उपयोगात असलेले इतर साहितत्यासह सागवान लाकूड 10 नग 0.110 घमी मुद्देमाल 65000/-रुपये किंमतीचे भारतीय वन अधिनियम 1927 नुसार जप्त करुन आरोपी विरुध्द वन गुन्हा वनपाल डोंगरकठोरा यांनी नोंद केला आहे.पुढील सखोल चौकशी सुरु आहे.फरार आरोपी चा शोध घेण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पुर्व यांनी पथके तयार केली आहे.
सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या रावेर, यावल,चोपडा,तालुक्यात अनेक ठिकाणी ग्रामीण भागात सातपुड्यातील सागवानी लाकडाची व इतर मौल्यवान लाकडाची अवैध तोड करून तसेच अनेक औषधीयुक्त झाडांचा वनस्पतीचा डिंक काढून सर्रासपणे मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू आहे यावल रावेर चोपडा तालुक्यातून बाहेरील राज्यात आणि जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात सागवानी लाकडाची तस्करी आणि अवैध वाहतूक सुरू आहे याबाबत यावल पूर्व आणि पश्चिम तसेच रावेर चोपडा अडावद इत्यादी वन परिक्षेत्रातील वन अधिकारी कर्मचाऱ्यांना याबाबत कोणतीही माहिती मिळत नाही का? ठिकाणी असलेल्या वन नाक्यावरून वाहने पास कशी होतात तसेच सातपुडा जंगलातील सागवानी लाकडाची अवैध वृक्षतोड सर्रासपणे कोण कोणाच्या आशीर्वादाने करीत आहेत तसेच ग्रामीण भागा सह शहरी भागात नवीन सागवानी लाकडाच्या दरवाजे खिडक्या सोपासेट दिवान इत्यादी मौल्यवान वस्तू अनेक फर्निचर दुकानातून कोणत्या नियमानुसार आणि कश्या विक्री होतात फर्निचर दुकानदारांना जुन्या सागवानी लाकडाच्या पासेसवर नवीन सागवानी लाकडाच्या पासेस कोण कशाप्रकारे देत असतात हे सर्वांना माहीत असली तरी संबंधित वनक्षेत्रपाल अधिकारी वनपाल वनसंरक्षक नाके कारकुन यांना समजून येत नाही का? तसेच यातील अनेक कर्मचारी आपल्या मुख्यालयाच्या ठिकाणी राहत नसल्याने अवैध सागवानी लाकडाची तस्करी करणाऱ्यांना मोठी संधी उपलब्ध होत आहे.
यावल,रावेर,चोपडा तालुक्यात वन विभागात सातपुडा डोंगरातून वन संपत्तीची अवैध लूट आणि अवैध वाहतूक सर्रासपणे सुरू असून सुद्धा नाम मात्र कारवाई होत असल्याने महाराष्ट्र राज्याचे महसूल व वन विभाग मुख्य सचिव,प्रधान मुख्य वनसंरक्षक,विभागीय आयुक्त,उपविभागीय व्यवस्थापक वन जमाबंदी अधिकारी यांच्यासह इतर संबंधित वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपले लक्ष केंद्रित करून ठोस निर्णय घेऊन कडक कारवाई करावी असे यावल रावेर चोपडा तालुक्यात बोलले जात आहे.