यावल तालुक्यातील शेतकरी त्रस्त, लोकप्रतिनिधी मस्त आणि वीज वितरण कंपनीची चांदी.

अनामित
यावल - वार्ताहर ( सुरेश पाटील) शेतकर्‍यांना अनियमित,कमी दाबाचा वीज पुरवठा,वीज पंप बंद असताना विजेचे बिल ट्रान्सफार्मर दुरुस्ती व देखभाल खर्च सुद्धा शेतकऱ्यांकडे,शेतातील डीपी वरील फ्युज बदलविणे,शेतातील इलेक्ट्रिक पोलवरील लोंबकणाऱ्या तारा सुद्धा शेतकऱ्यांनी ताइट कराव्या इत्यादी वीज वितरण कंपनीची अनेक 
[ads id="ads2"]
कामे वीज वितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी शेतकऱ्यांच्या मजबुरीचा फायदा घेऊन शेतकऱ्यांकडूनच करून घेत असल्याने शेतकरी वैतागला असून त्रस्त झालेला आहे त्यामुळे शेतकरी त्रस्त लोकप्रतिनिधी मस्त आणि वीज वितरण कंपनीची चांदी असल्याचे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात बोलले जात आहे.
[ads id="ads1"]
     यावल तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या व्यथा आणि कथा ऐकून घेतल्या असता वीज वितरण कंपनीचे काही अधिकारी आणि कर्मचारी वीज वितरण कंपनीकडून निश्चित असे दरमहा वेतन घेत असले तरी तसेच अनेक कामांचा खर्च कार्यालयात दाखवीत असले तरी मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना शेती शिवारात वीज पुरवठा करताना शेतकऱ्यांच्या मजबुरीचा आणि वेळेची संधी साधून शेतकऱ्यांकडून बेकायदा कामे करून घेत आहेत.
  अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की आम्ही 100% वीजबिल भरण्यास तयार आहोत परंतु
आम्हाला दिवसा सतत 8 तास वीज पुरवठा योग्य दाबाने करायला पाहिजे,आम्हाला मिटर रिडींग प्रमाणे वीजबिल आकारा (कारण पावसाळ्यात आमचे पम्प 4 महिने बंद असतात तरीही आम्हाला वीजबिल तेव्हढेच HP प्रमाणे असते.हा मोठा आर्थिक अन्याय आहे,उन्हाळ्यात विहिरींना पाणी नसते आमच्या विहिरी कोरड्या असतात तरीही वीजबिल तेव्हढे आकारले जाते,
आमच्या DP वरील ट्रान्सफॉर्मर मधील ऑइल लेव्हल तुम्ही करा, कारण ट्रान्सफॉर्मर तुमचा आहे त्याचे मेंटेनन्स तुम्ही करायला हवे.
DP वरील फ्युज सुद्धा तुम्ही बदला,कारण त्या डीपीची जवाबदारी तुमची आहे असे शेतकऱ्यांना सांगितले जाते,
शेतातील पिकांवरून जाणाऱ्या इलेक्ट्रिक ताराआणि कंडक्टर तुम्ही टाईट करा,आणी सगळ्यात महत्वाचे आमच्या पोल वरील मिटर पर्यन्त सुरळीत सप्लाय आणून देणे (3फेज/1फेज 440/215 व्होल्ट)आमच्या वेळे प्रमाणे देणे हि जवाबदारी सुद्धा तुम्ही स्विकारा अर्थात ट्रान्सफॉर्मर शॉर्ट होवो,फ्युज खराब होवोत किव्वा कुठे इलेक्ट्रिक तार (कंडक्टर) तुटोत किंवा खाली येवो कुठल्याही वीज ग्राहकांना वर्गणी काढून पैसे देण्याची वेळ येऊ देऊ नका.जशी इंडस्ट्रियल किंवा एक्सप्रेस फिडर घेणाऱ्या ग्राहकाला सुविधा असते तशा सुविधा शेतकऱ्यांना का नाही. असा प्रश्न उपस्थित होत असून वीज वितरण कंपनी यांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना मासिक वेतन देत नाही का?किंवा शेतकऱ्यांकडून कामे करून घ्यावीत असा काही शासकीय नियम आहे का?याबाबत लोकप्रतिनिधी,समाजसेवक, शेतकरी संघटनासह ईतर संघटनांनी आपले लक्ष केंद्रित करून वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराला आळा घालावा किंवा ग्राहक मंचात न्यायालयात दाद मागून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा
असे बोलले जात असून या सर्व मागण्या मान्य न झाल्या झाल्यास यापुढे आता शेतकरी वीजबिल भरणार नाहीत आणि याला वीज वितरण कंपनी जबाबदार राहील अशी स्पष्ट वस्तूस्थिती निर्माण झाली आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!