चोपडा प्रतिनिधी (खेमचंद धनगर) 1 वर्षांपासून स्थगित झालेली चांदसनी कमळगाव श्री काळभैरव यात्रा भरत असल्याने आढावा बैठकीत निर्णय घेण्यात आला. आढावा बैठकीचे अध्यक्ष माननीय तहसीलदार श्री अनिल गावित सर हे होते
[ads id="ads2"]
तसेच अडावद पोलीस स्टेशनचे एपीआय (API) किरण दांडगे सर MSCBE चे माननीय अधिकारी चौधरीसाहेब आरोग्य अधिकारी डॉ लासुरकर साहेब कालभैरव संस्थेचे अध्यक्ष श्री दिलीप बाविस्कर उपाध्यक्ष श्री सुरेश आप्पा पाटील सचिव शालीग्राम तुळशीराम पाटील तसेच चांदसनी आणि कमळगाव गावाचे सरपंच उपसरपंच आणि सभासद उपस्थित होते चांदसनी गावचे पोलीस पाटील व तंटामुक्ती अध्यक्ष उपस्थित होते ह्या बैठकीत कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे नियम पाळून सर्व भविकभक्तांना यात्रेसाठी येतांना लस आणि मास्क बंधनकारक असेल असे सांगण्यात आले आणि तसेच कोरोनाचे सर्व नियम पाळून काळभैरव यात्रा उत्सव करण्याचे ठरले