भुसावळ : कोरोनामुळे 24 मार्च 2019 पासून चाळीसगाव पॅसेंजर बंद करण्यात आल्याने चाकरमान्यांसह सर्वसामान्य प्रवाशांना मोठा आर्थिक फटका सोसत खाजगीसह अन्य वाहनांनी प्रवास करावा लागत होता.[ads id="ads1"]
मात्र लोकप्रतिनिधी व प्रवाशांच्या सततच्या मागणीनंतर रेल्वे प्रशासनाने या मार्गावर गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे मात्र पॅसेंजरऐवजी आठ डब्यांची मेमू गाडी धुळे-चाळीसगाव दरम्यान सोमवार, 13 डिसेंबरपासून चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. [ads id="ads2"]
दिवसातून दोन वेळा या गाडीच्या फेर्या होतील शिवाय रविवारी मात्र मेमू बंद ठेवण्यात येणार असून प्रवाशांना कोरोना नियमांचे पालन केल्यानंतरच या गाडीत प्रवेश दिला जाणार आहे.

