रावेर प्रतिनिंधी (राजेंद्र अटकाळे)
रावेर तालुक्यातील वाघोड येथे देशातील पहिले चिफ ऑफ डिफेन्स जनरल बिपिन रावत त्यांच्या पत्नी व सैन्य दलातील इतर सहकारी यांचे आठ डिसेंबर रोजी तामिळनाडू मध्ये शाळेच्या कार्यक्रमासाठी जात असताना अचानक हेलिकॉप्टरचा अपघात होऊन दुखःद निधन झाले होते .[ads id="ads1"]
त्यांनी पाकिस्तानातील हवाई हल्ला असो कि चीन सीमेवरील तणाव असो यामध्ये महत्वाची भूमिका निभावली असल्याने देश त्यांच्या या एकाएकी जाण्याने देशातील सैन्य दलात मोठी पोकळी विमान झाली असुन त्यांच्या स्मरणार्थ *श्री कुँवरस्वामी फाउंडेशन व समस्त गावकरी वाघोड* यांच्या वतीने गावातील महात्मा फुले चौकात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. [ads id="ads2"]
आयोजीत शोकसभेत सर्वच स्तरातील गावकर्यांनी ८ डिसेंबर २०२१ रोजी हेलिकॉप्टरच्या दुर्घनेत शहिद होऊन हौतात्म्य प्राप्त झालेल्या प्रथम सी.डि.एस् जनरल बिपीन रावत,त्याच्या पत्नी आणि इतर सैन्य अधिकारी, जवान अशा १४ हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते मुख्य चौकातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालुन पूजन करण्यात आले त्यानंतर हुतात्म्यांच्या प्रतिमेला उपस्थित गावकर्यांच्या वतीने सेवानिवृत सैनिक श्री रविंद्र महाजन,श्री सोपान महाजन .कार्यरत सी.आय.एस्.एफ् जवान महेंद्र शिंपी ,तसेच रावेर पोलीस स्टेशनचे पी आय.सचिन नवले , पी.एस्.आय. श्री जाधव साहेब, सरपंच श्री संजय मशाने यांनी पुष्पहार अर्पण करुन श्रद्धांजली वाहून आपले श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी गावातील सरपंच संजय मशाने , पंचायत समितीचे माजी उपसभापती सुनील पाटील माळी समाज सचिव संतोष महाराज ,श्री कुँवरस्वामी फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रमोद चौधरी विकासो चेअरमन लक्ष्मिकांत महाजन, मराठा समाज अध्यक्ष अशोक पाटील दूध उत्पादक सोसायटी चेअरमन हिरामण महाजन , भारत एज्युकेशन सोसायटीचे डॉक्टर धनंजय महाजन ग्रां.पं सदस्य विजय माळी, किरण पाटील , राहुल पाटील , नितिन माळी , अतुल चौधरी, विलास महाजन चेतन महाजन, प्रशांत पाटील संतोष चौधरी , विनोद महाजन , गोपाळ महाजन यांसह गावातील सर्व निवृत्त शिक्षक तसेच इतर क्षेत्रातील सर्व आजी माजी कर्मचारी, व्यावसायिक ,विद्यार्थी,विद्यार्थीनी युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या श्रद्धांजली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन माळी यांनी केले तर आभार प्रमोद चौधरी यांनी मानले कार्यक्रमाच्या नियोजनासाठी श्री.कुँवरस्वामी फाउंडेशन च्या सर्व पदाधिकारी परिश्रम घेतले.

