मोलकरणीवर अत्याचार प्रकरणी वकिलाविरूध्द पोलिसात गुन्हा दाखल

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

जळगाव प्रतिनिधी(समाधान गाढे) घरात काम करणार्‍या मोलकरणीवर अत्याचार करून तिचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करणार्‍या वकिलाच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[ads id="ads1"] 

या संदर्भात वृत्त असे की, राजेश साहेबराव गवई (रा.श्यामनगर) या वकिलाच्या घरी पीडित महिला मोलकरणी म्हणून काम करीत होती. या दरम्यान त्याने पीडितेशी प्रेमसंबंध निर्माण केले. पीडितेच्या पतीस देखील त्याने या संबंधांची माहिती दिली. त्यामुळे पतीने पीडितेशी नाते तोडले. त्यानंतर गवईने पीडितेला धमक्या देण्यास सुरुवात केली. यातच त्या महिलेचे आधी चित्रीत केलेले व्हिडीओ व्हायरल करून तिची बदनामी देखील केली.[ads id="ads2"] 

या अनुषंगाने पीडित महिलेने मंगळवारी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गवईच्या विरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार विनयभंग व आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या वकिलावर आधी सरकारी अभियोक्ता असतांना एसीबीने कारवाई देखील केली होती अशी माहिती समोर आली आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!