यावल ( सुरेश पाटील) यावल महसूल व वनपरिक्षेत्र कार्यक्षेत्रात अनधिकृतपणे कोळसा भट्ट्या बिनधास्तपणे सुरू झालेल्या आहेत याकडे यावल पूर्व-पश्चिम वनक्षेत्रपाल आणि तहसीलदार यांचे दुर्लक्ष आहे का?असे संपूर्ण यावल तालुक्यात बोलले जात आहे.[ads id="ads1"]
यावल पूर्व-पश्चिम वनविभाग कार्यालय,तसेच यावल तहसील कार्यालयापासून 8 ते 10 किलोमीटर अंतरावर बोरावल,टाकरखेड़ा,भालशिव पिंप्रि परिसरात तसेच हतनूर धरण पाटाच्या आजूबाजूस तसेच तापी नदीच्या किनारपट्टी भागात हजारो बाभुळ व इतर वृक्षांची अनाधिकृतपणे कत्तल करून त्या लाकडांची भट्टी लावून लाकडे जाळून हजारो टन कोळसा निर्मिती करण्याच्या भट्ट्या सुरू झालेल्या आहेत.[ads id="ads2"]
याकडे यावल पूर्व व पश्चिम वनक्षेत्रपाल तसेच यावल तहसीलदार यांनी आपले लक्ष केंद्रित करून कोळसा भट्टी माध्यमातून कोळसा विक्री व्यवसाय करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करून गुन्हे दाखल करावेत अशी मागणी संपूर्ण यावल तालुक्यातून होत आहे.