टेहू येथील जवानाचा अपघात झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यातील येथील आर्मी मधील जवान याचा दिनांक 9 रोजी रात्री मोटर सायकल अपघात झाला होता धुळे येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान आज त्याचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे त्यांची अंत्ययात्रा आज टेहू तालुका पारोळा येथून शासकीय इतमात होणार आहे.
[ads id="ads2"] 

     पारोळा तालुक्यातील टेहू येथील आर्मी सैन्य दला मध्ये कार्यरत असलेले नंदू संजय पाटील वय ३० हा जवान दिनांक आठ रोजी सुट्टीवर आपल्या मूळ गावी आला होता.[ads id="ads1"] 

  दिनांक नऊ रोजी वाघरे तालुका पारोळा येथे आपल्या नातेवाईकांकडे कार्यक्रमानिमित्त जात असताना टेहु ते वाघरे रस्त्यावर रात्री दहा वाजेच्या सुमारास समोरून एका वाहनाने त्याच्या मोटरसायकलला कट मारल्याने त्याच्या ताब्यातील मोटर सायकल खाली पडून ते जखमी झाले त्यांना धुळे येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते त्याच्यावर उपचारादम्यान आज दिनांक १२ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

हेही वाचा : - सरपंचांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष कराल तर याद राखा ; सरपंच परिषदेचा इशारा 

       ते गेल्या दहा वर्षापासून आर्मी या सैन्य दलात कार्यरत होता नायक म्हणून कार्यरत होते २१६ बटालियनमध्ये ते होते सध्या जबलपूर येथे त्याची नोकरीला होते त्याच्या जाण्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन वर्षाचा व चार वर्षाचे दोन मुले आहेत व एक अविवाहित भाऊ देखील आहे तो देखील आर्मीमध्ये नोकरीला आहे उद्या दुपारी एक वाजेच्या सुमारास शासकीय इतमात त्यांच्यावर टेहू ता. पारोळा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!