जळगाव प्रतिनिधी : शहरातील खंडेराव नगरात राहणाऱ्या 35 वर्षीय तरूणाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सुरेश नामदेव महाले (35, रा. सोयगाव, जि.औरंगाबाद, ह.मु.खंडेराव नगर, जळगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही.[ads id="ads1"]
सेंट्रींग चे काम करून कुटुंबाचा चालवणारे सुरेश महाले हे पत्नी व तीन मुलींसह वास्तव्यास होते. सोमवार दिनांक 13 डिसेंबर रोजी रात्री जेवण करून ते घराबाहेर पडले.नंतर सुरेश महाले यांनी खंडेराव नगर परीसरात धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याचे रात्री 9वाजेच्या सुमारास उघडकीस आले. [ads id="ads2"]
आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. त्यांच्या मृतदेह जळगाव-शिरसोली दरम्यान खांबा क्रमांक 416/25 ते 27 दरम्यानच्या डाऊन रेल्वे रूळावर आढळून आला.या संदर्भात उपस्टेशन प्रबंधक अमरचंद मुलचंद अग्रवाल यांनी दिलेल्या खबरीवरुन रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. लालसिंग बारेला तपास करीत आहेत. रात्री उशिरापर्यंत परिसरातील नागरीकांनी मृतदेहाची ओळख पटवली. त्यांच्या पश्चात पत्नी ललिताबाई तसेच शीतल, पुजा, सुप्रिया ह्या तीन मुली असा परीवार आहे.

