संभाजी ब्रिगेड व निळे निशाण सामाजिक संघटनेची संयुक्त बैठक संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे) रावेर येथे संभाजी ब्रिगेड व निळे निशाण सामाजिक संघटनेची संयुक्त बैठक निळे निशाण सामाजिक संघटनेच्या मुख्य कार्यालयात संपन्न झाली.[ads id="ads1"] 

    रावेर येथे दि .३०/१२/२०२१ रोजी निळे निशाण सामाजिक संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत १ जानेवारी शौर्य दिनानिमित्त घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाच्या पुर्व तयारिचा आढावा घेण्याच्या उद्देशाने संभाजी ब्रिगेड व निळे निशाण सामाजिक संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली.[ads id="ads2"] 

 या बैठकीमध्ये १ जानेवारी  सुप्रसिद्ध गायिका कडुबाई खरात यांच्या प्रबोधनात्मक भिमगितांचा कार्यक्रम तसेच सकाळी १०:०० वाजेला विजस्तंभाला मानवंदना देण्यात येईल तसेच १ जानेवारीला होणारे कार्यक्रम संभाजी ब्रिगेड व निळे निशाण सामाजिक संघटना  या दोघेही संघटना संयुक्त रित्या कार्यक्रम पार पाडतिल असे ठरविण्यात आले . समाजात एकोपा निर्माण करून जातिय सलोखा आबादीत ठेवण्याचा निळे निशाण व संभाजी ब्रिगेड या दोघेही संघटनेचा भविष्यात प्रयत्न असेल या उद्देशाने  संघटनेचे संस्थापक  / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष विनोद चौधरी , रावेर शहर अध्यक्ष मोरेश्वर सुरवाडे , व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!