दुःखद : सहाय्यक तलाठी राजेंद्र झांबरे यांचे उपचारादरम्यान निधन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


विशेष प्रतिनिधी (समाधान गाढे) यावल येथील सहाय्यक तलाठी आपले दैनंदिन कामकाज आटोपून फैजपूरकडे जात असताना चितोडा गावाजवळ त्यांच्या मोटर सायकलला मालवाहू ॲपे रिक्षाची धडस झाली.[ads id="ads1"] 

त्यांना गंभीर जखमी अवस्थेत यावल ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक औषधोपचार करून गोदावरी हॉस्पिटल येथे औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची शनिवार दि. ११ डिसेंबर रोजी अखेर प्राणज्योत मालवली.[ads id="ads2"] 

यावल शहराचे सहाय्यक तलाठी राजेंद्र शांताराम झांबरे हे फैजपूरहुन यावल येथे तलाठी कार्यालयामध्ये ये जा करतात. संध्याकाळी दिवसभराचे कामकाज आटोपून घरी परतीच्या प्रवासावर असताना चितोडा गावाजवळ त्यांची मोटरसायकलला ( क्र. एमएच १९-६२१७) समोरून येणारी मालवाहू ॲपे रिक्षा (क्र. एमएच १९ -२५७७) ची समोरासमोर जोरदार धडक बसली.

   या भिषण अपघातात राजेंद्र झांबरे यांच्या डोक्यास गंभीर दुखापत होवुन ते गंभीर जखमी झाले. त्यांना प्रथम यावलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करून त्यांचे सहकारी तलाठी यांच्या सहकार्याने तात्काळ गोदावरी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. राजेन्द्र भारंबे यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना ऑक्सीजनवर ठेवण्यात आले होते. मोठया प्रमाणावर सक्तस्त्राव झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले होते, या भिषण अपघातात त्यांच्या गाडीचा पुर्णपणे चुराडा झाला. ॲपे रिक्षा ही पुढच्या साईडला चांगलीच ठोकली गेली. 

  या भिषण अपघातात गंभीर जखमी असलेले तलाठी राजेंद्र शांताराम झांबरे (रा. लक्ष्मीनगर फैजपुर) यांच्यावर गोदावरी हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयामध्ये औषधोपचार सुरू असताना अखेर शनिवार दि. ११ डिसेंबर रोजी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर फैजपूर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आले. याप्रसंगी महसूल खात्याचे सर्व तलाठी, मंडळ अधिकारी व कर्मचारी अंत्ययात्रेच्या वेळी उपस्थित होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!