Nimbhora,Raver : स्मशानभूमीतून अस्थींची चोरी ; कारवाईची मागणी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 निंभोरा (ता. रावेर) येथील वाघोदा रोडवरील हिंदू स्मशानभूमीतून मध्य स्मशानभूमीतून अस्थींची चोरी ; कारवाईची मागणी [ads id="ads1"] 

 एका मृत महिलेच्या अस्थींची चोरी करण्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली. दिनांक ९ रोजी रजनीबाई रमाकांत सोनार यांच्या मृतदेहावर निंभोरा (ता.रावेर) येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार   करण्यात आले. सकाळी त्या महिलेच्या अस्थी संकलनासाठी गेले असता त्यांच्या नातेवाईकांना मोठा धक्का बसला.[ads id="ads2"] 

   त्या स्मशानभूमीतून रात्री अज्ञात व्यक्तीने त्यांच्या अस्थी चोरून नेल्याचे आढळले. या आधीही अनिल सोनार यांच्या अस्थींचीही चोरी झाली होती. या प्रकरणी सर्वांना जादूटोणा करणाऱ्या व्यक्तींविषयी संशय असून अशा मांत्रिक व जादूटोणा करणाऱ्या व्यक्तींवर कारवार्ड करण्याची मागणी त्यांच्या परिवाराकडून केली जात आहे . दरम्यान या प्रकाराबाबत पोलिसांनी दखल घेऊन संबंधित चोरट्याचा बंदोबस्त करावा , अशी मागणी संपूर्ण गावासह परिसरातून केली जात आहे .

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!