रावेर प्रतिनिधी : छ.शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची झालेल्या विटंबनेच्या निषेधार्थ रावेर तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना प्रहार तर्फे निवेदन देण्यात आले.[ads id="ads1"]
कर्नाटक राज्यातील बंगळूर येथे काही दिवसांपूर्वी छ.शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांकडून विटंबना करण्यात आली होती.विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना अटक करून कठोर शासन होणे गरजेचे आहे,जर तसे नाही झाले तर आम्ही शिवप्रेमी त्यांना अद्दल घडवल्याशिवय स्वस्थ बसणार नाही.याची शासनाने नोंद घ्यावी.[ads id="ads2"]
अश्या आशयाचे निवेदन रावेर नायब तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आहे यावेळी प्रहार युवा जिल्हाप्रमुख अविनाश पाटील,रावेर तालुका युवा प्रमुख योगेश निकम,प्रहारसेवक राजेंद्र पाटील,मच्छिन्द्र कोळी,लतिफ शेख,मनोज वरणकर,नरेंद्र कोळी,नरेंद्र पाटील,वाजीद खान व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

