Jalgaon : कौटुंबिक न्यायालयामध्ये ऑन लाईन पद्धतीने घटस्पोट मंजुर

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


 जळगाव येथील नवरा बायको यांनी परस्पर समजुतीने घटस्पोट त्यांनी जळगाव येथील कौटुंबिक न्यायालय येथे अर्ज दाखल केला होता परंतु अर्जदार मुलगा हा कामा निमित्त अमेरिका येथे स्थायिक झालेला आहे.[ads id="ads1"] 

   जागतिक कोरोना महामारीमुळे त्यास व्यक्तीशः न्यायालयासमोर हजर राहणे शक्य नव्हते त्यामुळे त्याने त्याचा लहान भाऊ यास जनरल मुखत्यार पत्राच्या आधारे अधिकार प्रदान करून सदरचा अर्ज दाखल केला.[ads id="ads2"] 

  अर्जदार मुलगा याची प्रत्यक्ष पडताळणी कायद्याप्रमाणे गरजेची असलेमुळे अर्जदार मुलगा ह्याची पडताळणी व्हिडीओ कॉन्फरंस द्वारे करण्यात यावी यासाठी अर्जदार यांचे माहितगार वकील अॅड. विरेंद्र एम. पाटील यांनी परवानगीचा अर्ज सादर केलेला होता. त्यासाठी त्यांनी मा. उच्च न्यायालय यांचे कडील न्याय निवाड्याचा आधार घेतला होता. सुनावणी अंती सदरचा अर्ज न्यायालयाने मंजुर करूनअर्जदार मुलगा याची पडताळणी व्हिडीओ कॉन्फरंस द्वारे पडताळणी मा. न्यायाधीश रितेश लिमकर सो. यांनी घेतली. त्यानंतर न्यायालयाने सदरचा घटस्पोट मंजुर केला.
  जळगाव येथे कौटुंबिक न्यायालयाची स्थापना झाले नंतर प्रथमच अश्या प्रकारच्या घटस्पोट अर्जावर सुनावणी होऊन जनरल मुखत्यारच्या आधारे घटस्पोट होणे ही जळगाव न्यायालया मधील पहिलीच घटना आहे. तसेच नविन तंत्रज्ञानाचा वापर करून मा. न्यायालय व पक्षकार यांचा दोघांचाही वेळ व पैसा वाचला आहे. अर्जदार यांचे तर्फे अॅड.विरेंद्र एम. पाटील, अॅड. भुषण जे. पाटील व अॅड. राकेश डी. बाविस्कर यांनी कामकाज पाहिले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!