तामसवाडी जि.प.शाळेमार्फत प्रभात फेरीद्वारे लसीकरणाबाबत प्रबोधन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 तामसवाडी ता.रावेर प्रतिनिधी (राजेश रायमळे) तामसवाडी ता.रावेर येथे कोविड १९ लसीकरणाबाबत जि.प.मराठी मुलांची शाळेमार्फत प्रभात फेरी काढून गांवभर प्रबोधन करण्यात आले.[ads id="ads1"] 

      याबाबत सविस्तर वृत्त असे की  तामसवाडी ता.रावेर येथे लसीकरण जनजागृती मोहीम जोमात जारी असून कर्मचारी घरोघरी जाऊन लसीकरणाबाबत प्रबोधन आणि जनजागृती करित आहेत. [ads id="ads2"] 

          तसेच कोरोनाचा नवा व्हेरिएन्ट Omicron च्या पार्श्वभूमीवर शासन स्तरावरून नवीन नियमावली जाहीर झालेली असून लसीकरण अनिवार्य असलेची शासनाची नियमावली बाबत तसेच कोव्हीड अनुरूप वर्तन बाबत  आवाहन व त्यासाठी प्रबोधन करण्यासाठी तामसवाडी ता.रावेर येथील कर्मचारी सज्ज झालेले असून सदर कर्मचारी घरोघर जाऊन लसीकरणाबाबत प्रबोधन आणि जनजागृती करत आहेत. लसीकरणाबाबत जनजागृती करत असतांना विविध उपक्रमांद्वारे कर्मचारी प्रबोधन करित आहेत. आज दिनांक १६ डिसेंबर २०२१ गुरुवार रोजी जि.प.मराठी मुलांची शाळा तामसवाडीचे मुख्याध्यापक मंगेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील मुलामुलींची प्रभात फेरी काढण्यात आली व लसीकरणाबाबत प्रबोधन करण्यात आले.यावेळेस शाळेतील मुलामुलींच्या हाती घोषवाक्यांचे फलक देऊन गांवभर प्रभात फेरी काढून घोषणांच्या निनादात लसीकरणाबाबत प्रबोधन करण्यात आले.यावेळेस मुख्याध्यापक मंगेश विक्रम माने,ऊपशिक्षक भुषण शिवाजी गवारे,आंगणवाडी सेविका शोभाबाई बाजीराव नेमाडे, संगीता समाधान खैरे,आशावर्कर सुरेखा बाळकृष्ण नेमाडे,  आणि गावचे पोलीस पाटील सुलक्षणा राजेश रायमळे तसेच पत्रकार राजेश वसंत रायमळे उपस्थित होते

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!