रावेर तालुका प्रतिनिधि (राजेश रायमळे) तामसवाडी ता.रावेर येथील ग्रामपंचायत कार्यालयात महामानव प्रज्ञासूर्य डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या ६५व्या महापरिनिर्वाण दिनी महामानवाला ग्रामपंचायतीच्या नऊ पैकी मात्र तिन सदस्यांच्या उपस्थितीत मानवंदना देण्यात आली.[ads id="ads1"]
मात्र तिनच सदस्यांची उपस्थिती ;बाकी सदस्यांची दांडी
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तामसवाडी ता.रावेर येथील ग्रामपंचायत कार्यालयात महामानव, भारतीय घटनेतचे एकमेव शिल्पकार,भारतरत्न, विश्वभूषण, परम् पुज्य बोधिसत्व बाबासाहेब डाॅ.भीमराव रामजी आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनी ग्रामपंचायत मार्फत मानवंदना देण्यात आली. [ads id="ads2"]
यावेळेस डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमार्फत दिलेल्या हक्क आणि अधिकारांची जाण असलेले ग्रामसेवक सी.व्ही.चौधरी,सरपंच दिपाली कोळी,सदस्य ज्योतिबाई रायमळे आणि सदस्य धनराज पाटील तसेच ग्रामपंचायत कर्मचारी सुकदेव कोळी,समाधान रायमळे व दिपक कोळी उपस्थित होते. ग्रामपंचायतीचे इतर सहा सदस्य मात्र अनुपस्थितीत होते.

