रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथील २५ वर्षीय तरूणाने राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली. याप्रकरणी रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.[ads id="ads2"]
राहूल गौतम सपकाळे (वय-२५) रा. तांदलवाडी ता. रावेर असे मयत तरूणाचे नाव आहे. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. आत्महत्या केल्याचे समजल्यावर नातेवाईकांनी तातडीने रावेर ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता त्याला मयत घोषीत केले. याप्रकरण निंभोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.