जळगाव प्रतिनिधी (समाधान गाढे) जळगाव शहरातील खोटे नगरातील एका २४ वर्षीय तरुणाने धावत्या रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली आहे. तेजस मनोजसिंग राजपूत (परदेशी) असे तरुणाचे नाव आहे.[ads id="ads1"]
तेजस हा खासगी कंपनीत कामाला होता. त्याने आत्महत्या का केली याचे नेमके कारण समजू शकले नाही, मात्र त्याने खोटे नगरात नुकतेच घर घेतले होते. त्यामुळे तो कर्जबाजारीही झाला होता. त्याशिवाय तो नैराश्यातही होता, अशी माहिती त्याच्या मित्रांकडून मिळाली.[ads id="ads2"]
वडील रावेर येथे चालक म्हणून काम करतात तर आईदेखील कंपनीत कामाला आहे. आई व वडील विभक्त आहेत. तेजस हा अविवाहित होता. खोटे नगरात गणपती मंदीराजवळ तो आईसोबत राहत होता. परदेशी दाम्पत्याचा एकुलता मुलगा असल्याची माहिती आहे.

