नाशिक प्रतिनिधी । सुशिल कुवर
नाशिकमध्ये कोरोना रुग्णात मोठी वाढ होत आहे. यामुळे प्रशासनाने कठोर निर्बंध लावण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु केल्या आहेत. आज संध्याकाळी यासंदर्भात बैठक होणार असून निर्बंध जाहीर केले जाण्याची शक्यता नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.
भुजबळ म्हणाले की, मुंबईत वेगाने कोरोना रुग्ण वाढत आहे. नाशिकमध्ये ही काही प्रमाणात कोरोनाची रुग्णवाढ होत आहे. यामुळे हातावर हात धरुन बसता येणार नाही. २८ डिसेंबर रोजी ४२१ कोरोना रुग्ण होते. आता ५ जानेवारी रोजी १४६१ रुग्ण झाले आहेत. म्हणजे आठवड्यात हजाराच्या वरती कोरोना रुग्ण वाढले. ही वाढ नाशिक शहराप्रमाणे जिल्ह्यातही होत आहे.
कोरोनाच्या रुग्णवाढीच्या दृष्टीने आपण तयारी ठेवली आहे. आज संध्याकाळ बैठक घेऊन काय करता येईल, याचा निर्णय घेण्यात येईल, असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला.