उटखेडा येथील तरुणांचा प्रहार मध्ये प्रवेश
दिनांक २७जानेवारी रोजी प्रहार जनशक्ती पक्षाची रावेर तालुका युवा कार्यकारिणी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल भाऊ चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत, युवा जिल्हा प्रमुख अविनाश भाऊ पाटील यांच्या सहीचे नियुक्तीपत्र देऊन घोषित करण्यात आली. [ads id="ads2"]
त्यात रावेर तालुका उपाध्यक्ष पदी शिंदखेडा येथील राजू भाऊ पाटील आणि निंबोल येथील भगवान भाऊ कोळी यांची नियुक्ती तर तालुका सचिव पदी निंबोल येथील मच्छिन्द्र भाऊ कोळी आणि रावेर शहर उपाध्यक्ष पदी मनोज भाऊ वरणकर व शे.लतिफ शे.समद यांची नियुक्ती करण्यात आली. या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष गणेश भाऊ बोरसे व ता.युवा प्रमुख योगेशभाऊ निकम उपस्थित होते तसेच उटखेडा येथील तरुणांनी प्रहार मध्ये जाहीर प्रवेश केला.या वेळी दीपक भाऊ पाटील, उटखेडा येथील तरुण व कार्यकर्ते उपस्थित होते.