रावेर प्रतिनिंधी ( राजेंद्र अटकाळे)
रावेर येथील श्री. व्ही. एस. नाईक कला,वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय रावेर येथे दिनांक 14 जानेवारी 2022 ते दिनांक 28 जानेवारी 2022 या कालावधीमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे.[ads id="ads1"]
या निमित्ताने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत. १४ जानेवरी रोजी विद्यार्थ्यांसाठी 'मराठी संस्कृती ' या विषयावर रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये कला , वाणिज्य, विज्ञान, संगणकशास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.[ads id="ads2"]
या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक - कु.विद्या संजय जवरे ( द्वितीय वर्ष विज्ञान ) द्वितीय क्रमांक - कु. काजल कैलास धनगर ( प्रथम वर्ष कला ) तृतीय क्रमांक - कु. योगेश संतोष धन्जे( द्वितीय वर्ष कला ) यांनी मिळवले तर उत्तेजनार्थ क्रमांक - ऐश्वार्या सोनलाल महाजन ( द्वितीय वर्ष विज्ञान , संगणकशास्त्र )यांनी मिळवला.या स्पर्धेतील विजेत्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.व्ही. दलाल उपप्राचार्य डॉ.व्ही.बी. सूर्यवंशी, नॅक समन्वयक डॉ.एस.आर. चौधरी ,सिनेट सदस्य डॉ.ए.जी.पाटील यांनी अभिनंदन केले. या स्पर्धेचे आयोजन मराठी विभाग प्रमुख डॉ.जी. आर. ढेंबरे यांनी केले होते. रांगोळी स्पर्धेचे समन्वयक प्रा.एस.डी. धापसे हे होते. या स्पर्धेचे मूल्यमापन डॉ.बी.जी. मुख्यदल व प्रा.एम.डी. तायडे यांनी केले.