ऐनपुर प्रतिनिधी (विजय एस अवसरमल) ऐनपुर येथील ज्योत्स्ना पंडित महाजन यांना विरांगना सावित्रीबाई फुले फेलोशिप राष्ट्रीय अवार्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[ads id="ads1"]
सविस्तर वृत्त असे की ऐनपुर येथील एकदंत महीला ग्रामसंघा चे अध्यक्ष समाज सेविका ज्योत्स्ना पंडित महाजन यांना भारतीय दलित साहित्य अकादमी नवी दिल्ली यांच्या कडून उत्कृष्ट महीला संघटन करून कोरोना काळात महीलांचे बचत गट स्थापन करून आरोग्य सेवा व आरोग्य बाबत प्रचार व प्रसार केला याची दखल घेऊन त्यांना दलित साहित्य अकादमी नवी दिल्ली यांच्या कडून विरांगना सावित्रीबाई फुले फेलोशिप राष्ट्रीय अवार्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[ads id="ads2"]
हा पुरस्कार दिनांक ०३/०१/२०२२ रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त एकदंत महीला ग्रामसंघा चे कार्यालयात ऐनपुर ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी प्रताप बोदडे व सरपंच अमोल महाजन यांच्या हस्ते ज्योत्स्ना पंडित महाजन यांना सत्कार करून पुरस्कार देण्यात आला यावेळी ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी प्रताप बोदडे, सरपंच अमोल महाजन ,विजय एस अवसरमल, सचिन काशिनाथ सोनार, ग्रामपंचायत चे लिपिक सोपान कोळी एकदंत महीला ग्रामसंघा चे सचिव ममता नितीन पाटील कोषाध्यक्ष सुनंदा ज्ञानेश्वर महाजन सदस्य छाया ईश्वर महाजन, मालती निवृत्ती महाजन, वंदना समाधान महाजन, रेखा नितीन महाजन, सि आर पी कविता अनिल सोनार, ज्योत्स्ना गणेश महाजन, वैशाली हेमराज महाजन, रंजना मोहन महाजन, पुजा योगेश जोशी, वर्षा विजय अवसरमल, सुनंदा सुरेश अवसरमल उपस्थित होते.