तांदलवाडी फाटा ते सुनोदा रस्त्याने मोटारसायकल घसरल्याने अपघात होऊनरावेर तालुक्यातील मोठे वाघोदा येथील प्रगतीशील शेतकरी गोपाल महाजन हे ठार झाले. [ads id="ads1"]
रावेर तालुक्यातील मोठे वाघोदा येथील रहिवासी गोपाल किसन महाजन (वय ६१ ) हे सोमवारी टाकळी येथून वाघोदा येथे स्वतःच्या दुचाकीने (क्रमांक एमएच १९ डीयू. ६४७५) जात होते. दुपारी ४.३० ते ५ वाजेच्या सुमारास सुनोदा गावाजवळ त्यांची दुचाकी अचानक घसरली. या अपघातामध्ये महाजन हे गंभीर जखमी झाले.[ads id="ads2"]
ते घटनास्थळी पडून होते. त्यांना तांदलवाडी येथील श्रीकांत महाजन यांचेसह इतर नागरिकांनी रुग्णवाहिका बोलावून तत्काळ फैजपूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये हलवले. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. ते वाघोदा येथील प्रगतीशील शेतकरी डी. के. महाजन यांचे लहान बंधू होत.त्यांच्या निधनाने परिसरावर शोककळा पसरली आहे.

