धरणगाव प्रतिनिधी - पी.डी.पाटील सर
धरणगाव आज राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती उत्सवाचे औचित्य साधून जवाहर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ,के.जी. गुजराथी मूकबधिर निवासी विद्यालय,मतिमंद निवासी अनिवासी विद्यालय, मूकबधिर निवासी कार्यशाळा यांच्या द्वितीय वर्ष दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्सवात पार पडला.[ads id="ads1"]
जवाहर शिक्षण प्रसारक मंडळाच्या द्वितीय वर्ष दिनदर्शिकेचे प्रकाशन गुलाबरावजी देवकर (माजी पालकमंत्री, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष) यांच्या हस्ते करण्यात आले.[ads id="ads2"]
प्रथम राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तद नंतर दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्सवात पार पडला.ह्या प्रसंगी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष पदी निवड झाली म्हणून संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच दिनदर्शिकेचे उपक्रम राबवित असलेल्या उपक्रमशील शिक्षक मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री ऋषिकेश जाधव सर यांचा सत्कार गुलाबराव जी देवकर यांच्या हस्ते करण्यात आला.ह्या प्रसंगी संस्था उपाध्यक्ष पुरुषोत्तम साळुंके विश्वस्त एकनाथ पाटील तसेच अरविंद देवरे ओबीसी सेल कार्याध्यक्ष, मोहन पाटील ग्रंथालय सेल तालुकाध्यक्ष, दिलीप आण्णा धनगर,दिपक वाघमारे, धनराज माळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष, नाटेश्वर पवार तालुकायुवक अध्यक्ष हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.सुत्रसंचालन आर.एच.पाटील यांनी केले.तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुकबधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक वाल्मीक पाटील , मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक ऋषिकेश जाधव, विशेष शिक्षक दिपक जाधव, संतोष भडांगे, किशोर पाटील, चंद्रराव सैंदाने, अनंत जाधव,मुकबधीर कार्यशाळेचे निर्देशक राकेश पाटील, दिलीप पाटील, उमेश पाटील, आरिफ शहा, राकेश पाटील, अमोल पाटील, कल्पनाबाई ठाकरे यांनी परिश्रम घेतले.