रावेर प्रतिनिधी (सिद्धार्थ ठाकणे) रावेर शहरानजीक रीक्षा (Rickshaw) उलटल्याने तीन महिला जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाल्याने त्यांना जळगावला (Jalgaon) येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. [ads id="ads2"]
रावेर शहरातील मराठा मंगल कार्यालयानजीक (Maratha Mangal Karyalaya) अॅपेला कट मारताना दुसरी अॅपे रीक्षा उलटली. या अपघातामध्ये अहिरवाडी (Ahirwadi) येथील तीन महिला जखमी झाल्या. यातील दोन महिला किरकोळ जखमी झाल्या असून एक महिलेला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारार्थ जळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये (Jalgaon Civil Hospital) रवाना करण्यात आले आहे.
हेही वाचा :- रावेर तालुक्यातील पाडळे बु येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले ;पोलिसात गुन्हा दाखल
हेही वाचा :- देवतारी त्याला कोण मारी ! रेल्वेगाडीखाली सुदैवाने वाचला एकाचा जीव ; नाशिक येथील घटना