रावेर प्रतिनिधी (समाधान गाढे) Raver तालुक्यात भूमी अभिलेख कार्यालयाच्या तक्रारीत प्रचंड वाढ झाल्याने नागरीकांनी आ.शिरिष चौधरींकडे (MLA Shirish Chaudhari) रावेर येथील भूमी अभिलेख कार्यालयात एक दोन कर्मचाऱ्यां शिवाय कर्मचारी नसणे, अधिकारी नसणे, नागरीकांना खरेदी विक्रीसाठी दस्तावेजांसाठी अनेक महिने फिरविणे, पैशांची मागणी करणे, पैसे घेवून देखील नागरीकांना चकरा मारायला लावणे.[ads id="ads1"]
कोणालाही न जुमानणे, तसेच सर्व कर्मचारी बाहेरगावाहून ये जा करतात अशा असंख्या तक्रारींची कैफ़यित मांडल्याने दि २७ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास थेट भूमी अभिलेख कार्यालय गाठत कामात दिरंगाई करणारे तालुका भूमीलेख अधियांसह कर्मचाऱ्यांची जिल्हा भूमी अभिलेख अधिकारी मगर , रावेर तहसीलदार (Raver Tahsildar) उषाराणी देवगुणे यांचे समक्ष चांगलीच कानउघाणी केली.[ads id="ads2"]
Raver भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी यांना ऐन थंडीत चांगलाच घाम फुटला. कार्यालयातील सगळ्यांना दोन महीन्यात नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करा, अधिकारी कर्मचारी कोण येतात नाही येतात, कोठे जातात यांची नोंद ठेवा. माझ्याकडे या पुढे लोकांच्या तक्रारी येता कामा नये, असा अल्टीमेटम देवून भूमी अभिलेख अधिकारी कर्मचाऱ्यांची आ शिरिष चौधरींनी चांगलीच शाळा घेतली.

