धरणगाव प्रतिनिधी - पी.डी. पाटील सर
धरणगांव - समाजातील सर्व जातीव्यवस्थेतील तळागाळातील नगरिकांतर्फे राज माता माँसाहेब जिजाऊ व युवकांचे प्रेरणा स्थान असलेले पूज्य.स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमीत्त शहरातील शिवसेना कार्यालय साने पटांगण या ठिकाणी या दोन महनीय वंदनीय दैवतांना प्रतिमा पूजन करून विनम्र आदरांजली वाहण्यात आली.[ads id="ads1"]
सर्व प्रथम सर्व समाजातील प्रतिष्टीत मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व माल्यार्पण करून विविध घोषणा देत वातावरणात एक प्रकार चैतन्य निर्माण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.या प्रसंगी कार्यक्रमाची प्रस्तावना व्ही. टी. माळी सर यांनीं केले. या प्रसंगी मनोगतात शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख मा.गुलाबरावजी वाघ यांनी केले.[ads id="ads2"] आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उध्दारी उद्धृत केलेल्या ओळी म्हणजे मातृत्वाच्या महन्मंगल अविष्काराच्या परमोच्च क्षणाचा सुंदर रेखीव नमुनाच! युगपुरुष शिवराय घडले, वाढले आणि... निश्चयाचा महामेरू । बहुता जनांसी आधारू । श्रीमंत योगी।' असे ज्यांचे वर्णन केले जाते, ती सारी कुणाची पुण्याई ध्येयवेड्या आईची, निराग्रही मातेची आणि वीरमाता, माँसाहेब जिजाऊंची!
राजमाता जिजाऊ साहेबांनी शिवनेरीच्या अंगाखांदयावर लहानाचा मोठा करताना, सह्याद्रीच्या कुशीत निर्भयपणे वावरायला, शिकविताना शिवरायांना महाभारत आणि रामायणातील 'राम आणि कृष्णांच्या' गोष्टींचे बोधामृत पाजताना स्वराज्यस्थापनेचे बाळकडू पाजले. तसेच
पूज्य स्वामी विवेकानंद यांच्या विषयी प्रतिपादन
केले की स्वामी विवेकानंद म्हणजे भारतीय इतिहासातील काही मोजक्या दैदिप्यमान पुरुषांपैकी एक! त्यांची जीवनगाथा इतकी प्रेरणादायी आहे की जीवनात सर्व काही गमावून बसलेल्या व्यक्तीला देखील त्यांच्या विचारधारेने जगण्याची नवसंजीवनी मिळावी. असे हे थोर रत्न भारताच्या नशिबी आले हे आपले सौभाग्यचं! त्यांच्या शिकवणीने तरुण पिढी आजही जागृत होते. आजही त्यांचे लाखो अनुयायी त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालत आहेत.
पूज्य स्वामी विवेकानंद हे आपल्या वकृत्वासाठी जगभर प्रसिद्ध होते. शिकागो मध्ये आयोजित करण्यात आलेल्या जागतिक धर्म परिषदेमध्ये हजेरी लावत स्वामी विवेकानंद यांनी आपल्या शब्दांनी सर्वांवरच छाप पडली होती. भारतीय संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचवण्यात स्वामी विवेकानंद यांचा मोलाचा सहभाग आहे हे नाकारता येण्यासारखे नाही.असे सांगून आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमा प्रसंगी माळी समाजाचे जेष्ट प्रगतिशील शेतकरी सुखदेव महाजन ,क्षत्रिय समाजाचे जेष्ट मेघराज कट्यारे, सेवा निवृत्त शिक्षक बी.ए. पाटील यांच्या शुभ हस्ते राजमाता माँसाहेब जिजाऊ व पूज्य.स्वामीविवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मा.लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी ,उप जिल्हा प्रमुख पी एम पाटील सर , नगरसेवक वासुदेव चौधरी ,भागवत चौधरी, नंदू पाटील ,सुरेश महाजन उपस्थित होते
तसेच तेली समाजांचे प्रतिनिधी राजेंद्र चौधरी ,संजय चौधरी ,भटू चौधरी, रमेश चौधरी माळी समाजांचे प्रतिनिधी कडू महाजन , गोपाल महाजन,गजानन महाजन, सुरेश महाजन ,भगवान महाजन, ज्ञानेश्वर महाजन ,नवनीत महाजन, राजू महाजन, एच डब्ल्यू पाटील, भैयाभाऊ महाजन, रामचंद्र माळी, हेमंत महाजन पंकज महाले,गणेश महाजन पाटील समाजाचे प्रतिनिधी दिलीप पाटील ,प्रकाश पाटील ,डीजे पाटील ,मोहन पाटील ,पी एम पाटील ,योगेश पाटील ,ज्ञानेश्वर पाटील, विनोद मराठे , नामदेव मराठे, समाधान पाटील, नागराज पाटील ब्राम्हण समाजाचे विनय भावे, किरण अग्निहोत्री श्रीपाद अग्निहोत्री नाभिक समाजाचे भगवान बोरसे, गणेश गायकवाड ,प्रवीण निकम, अहिरराव सर, कमलेश बोरसे, सतीश बोरसे , धोबी समाज प्रतिनिधी प्रकाश जाधव, रवींद्र जाधव ,छोटू जाधव, विनोद रोकडे ,धनगर समाज प्रतिनिधी भीमा धनगर, पप्पू धनगर खत्री समाज प्रतिनिधी मेघराज कट्यारे भाजीपाला असोसिएशनचे भगवान महाजन ,दीपक महाले, गजानन महाजन, विजय महाजन, शैलेश माळी *वाणी समाज प्रतिनिधी दिनेश येवले ,प्रशांत वाणी मारवाडी समाज प्रतिनिधी अनील पगरिया पांचाळ समाज प्रतिनिधी रमण पांचाळ शिंपी समाज मोहन मांडगे ,सुभाष बोरसे राजपूत समाज प्रतिनिधी धिरेन्द्र पुरभे, राजेंद्र सुर्यवंशी सोनार समाज प्रतिनिधी रवींद्र सोनार सुनील घोडेस्वार चर्मकार समाज प्रतिनिधी भानुदास विसावे, संजय बन्सी ,कृष्णा बन्सी, अंजलीताई विसावे बडगुजर समाज प्रतिनिधीवासुदेव बडगुजर,विजय बडगुजर , पत्रकार कडू महाजन , बाळासाहेब जाधव ,सतीश बोरसे, योगेश पाटील ,विनोद रोकडे ,योगेश प्रकाश पाटील तसेच धरणगाव शिवसेना महिला आघाडीच्या मा.नगराध्यक्षा उषाताई वाघ ,उपनगराध्यक्षा कल्पनाताई विलास महाजन, मा.उपनगराध्यक्षा अंजलीताई विसावे ,नेहा प्रकाश पाटील इ उपस्थित होते.
सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद रोकडे तर आभार प्रदर्शन धरणगाव शिवसेना शहराध्यक्ष राजेंद्र महाजन यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विलास भाऊ महाजन,अरविंद चौधरी, गोलू चौधरी गोपाल पाटील ह्यांनी सहकार्य केले.सदरील कार्यक्रमाचे आयोजन धरणगाव शिवसेना परिवारातर्फे करण्यात आले होते.