रावेर प्रतिनिंधी (राजेंद्र अटकाळे)
रावेर तालुक्यातील मोरगाव बु.येथील अतिक्रमण हटवुन त्या ठिकाणी शासनाने घरकुल ड यादी प्रसिध्द करावी या मागणी साठी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया यांचे वतीने आज दि. 26 जानेवारी बुधवार रोजी प्रजासत्ताक दिना पासून किरण ढिवरे, जनाबाई ढिवरे प्रिती ढिवरे आरती ढिवरे आशा ढिवरे रत्नाबाई तायडे यांनी रावेर येथील पंचायत समिती कार्यालया समोर आमरण उपोषण सुरु केले आहे . [ads id="ads1"]
त्यांनी या दि.10 डिसेंबर 2021 रोजी धरणे आंदोलन केले होते .त्याची गटविकास अधिकारी यांनी दरवल घेतली नाही त्यामुळे या लोकांना देशाच्या प्रजासत्ताक दिनी आमरण उपोषणाला बसावे लागल्याने खरे स्वातंत्र्य अजुन ही लोकांना मिळाले किंवा नाही असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला आहे . [ads id="ads2"]
जो पर्यंत प्रशासन अतिक्रमण हटविणार नाही तो पर्यंत आम्ही उपोषणधारक उपोषण सोडणार नाही असा इशारा किरण ढिवरे तालुका उपाध्यक्ष रिपाई आठवले गट यांनी प्रशासनाला दिला आहे.