बुद्धदीप सोसायटीतर्फे दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

मुक्ताईनगर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) येथे बुद्ध दीप सेवाभावी सोसायटी च्या माध्यमातून बुद्धदीप दिनदर्शिका कॅलेंडरचे प्रकाशन करण्यात आले जिल्ह्यात सर्वप्रथम बौद्ध धम्मीय संस्थेच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आलं या कार्यक्रमात सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीप पूजा धूप पुजा करण्यात आली.[ads id="ads1"] 

   नंतर बुद्धी दिनदर्शिका प्रकाशन करण्यात आले यानंतर पंचाने येथील रहिवासी नगरदेवळा हायस्कूल चे प्राध्यापक डॉक्टर किरण आत्माराम चव्हाण यांनी पीएचडी ही पदवी प्राप्त केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांना सेवारत्न सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्राचे नाम प्रख्यात कवी व गायक दादा प्रतापसिंगजी बोदडे हे होते.[ads id="ads2"] 

   तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष दादासाहेब एन जी शेजोळे यांना शेजोळे यांना देण्यात आले होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक संजय साळवे सर, भीमराव पवार गुरुजी, बी डी गवई साहेब, अडकमोल गुरुजी, एस टी हेरोडे, नगरसेवक कुंड गावचे उपसरपंच नंदू भाऊ हीरोळे, आरपीआय तालुकाध्यक्ष विक्रम भाऊ हिरोळे बापू ससाने. नगरसेवक मुकेश भाऊ वानखेडे, सामाजिक कार्यकर्ते विशाल भाऊ रोटे, ऍड. कुणाल गवई, डॉ.मुकेश तायडे, तसेच बुद्धदीप सेवाभावी सोसायटी मुक्ताईनगर या संस्थेचे अध्यक्ष दीपक इंगळे, उपाध्यक्ष महेंद्र भाऊ हिरोळे सचिव गजानन सुरवाडे, खजिनदार सुनील तायडे, सभासद अनिल वाघ, संतोष झनके, प्रवीण दामोदरे, यांनी परिश्रम घेतले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!