शिरपूर जि.धुळे (सुवर्ण दिप वृत्तसेवा) अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य " धुळे जिल्हा संघटक " राहुल दशरथ राठोड यांची नुकतीच गुजरात राज्य संघटक पदी निवड करण्यात आली आहे.[ads id="ads1"]
राहुल भाऊ राठोड हे मूळ भाटपुरा गावचे रहिवासी असून मागील एका वर्षा पासून ते अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन च्या धुळे जिल्हा अध्यक्ष पदी कार्यरत आहेत.[ads id="ads2"]
त्यांच्या समाजकार्याची दखल घेता राष्ट्रीय बंजारा परिषद चे अध्यक्ष श्री किसनराव राठोड यांनी राहुल भाऊ राठोड यांची गुजरात राज्य संघटक पदी निवड केली आहे.
त्यांच्या या नियुक्ती बद्दल फार्मासिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष दत्ता खराटे यांनि कौतुक केले, तसेच प्रदेश अध्यक्ष पंकज चौधरी आणि खान्देश विभाग अध्यक्ष सुशील महाराज विटनेरकर यांनी शुभेच्या दिल्यात.
शिरपुर शहर शिवसेना प्रमुख तसेच बंजारा संघटनेचे धुळे जिल्हा सरचिटणीस जितेंद्र भाऊ राठोड यांनि देखील त्यांचे कौतुक केलेत आणि पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्यात .