बुलढाणा (प्रतिनिधी) मेहकर तालुक्यातील देउलगाव माली हे गाव फुले शाहू आम्बेडकारांच्या विचाराच्या मार्गाने चालणारे सुप्रसिद्ध समतावादी गाव म्हणून सम्पूर्ण बुलडाणा जिल्ह्यात प्रसिद्ध गाव आहे, 15 हजारापर्यंत लोकसंख्या असलेल्या या गावात नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. [ads id="ads1"]
दिनांक 22/02/2022 रोजी गावातील अतिशय गरीब व मोलमजूरी करणारे कडुबा किसन गवई वय 38 वर्षे यांचा अचानक ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने रस्त्यावर पडून अचानक मृत्यु झाला ,सुस्वाभावि, शांत, कष्टआलू, घरातील एकमेव कमवता व्यक्ति गेल्याने खुप मोठे संकट सदर गवई परिवारावर आले.[ads id="ads2"]
त्यांच्या पाठिमागे 3 मूली एक मुलगा त्यामध्ये एक मुलगी मतिमंद, मुलगा हाताने अपंग आहे, अपंग मुलगा गणेश ,इंजीनियरिंग च्या दुसऱ्या वर्षाला नागपुर येथे शिकत आहे ,अशा परिस्थितीत आज दी 2602/2022 रोजी कालकथित कडुबा गवई यांचा रक्षाविसर्जन सुरु असताना कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सामाजिक कार्यकर्ते गजेंद्र गवई यांनी सदर परिवारास व मुलगा गणेश गवई याचे पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन करताच दे माली नगरीचे सरपंच किशोर भाऊ गाभने यांनी सदर परिवाराची ,आर्थिक परिस्थिति बघता व मुलगा गणेश यांचे शिक्षणासाठी रु 5000 ची आर्थिक मदत दिली , त्यांच्या सोबत सामाजिक कार्यकर्ते बबन कापरे यांनी रु 2100 रु दिले यासह उपस्थित नातेवाईक व गावकरी यांनी रु 1000, 500, 200, 100 याप्रमाणे काही क्षणातच सामाजिक बाँधीलकी जोपासत 17700 रु ची आर्थिक मदत सदर गरीब परिवाराला दिली गेली.
या उपक्रमामुळे संकट समयी गरजू गरीब , मोलमजूरी करणाऱ्या परिवारास आर्थिक मदत झाल्याने आर्थिक आधार मिळून खऱ्या अर्थाने सावरले गेले अशी चर्चा व *एकमेका सहाय्य करु अवघे धरु सुपंथ*असा चांगला संदेश पंचक्रोषित व नातेवाईकात गेला अशी चर्चा होत आहे.
सदर उपक्रम राबविन्यासाठी सामाजिक कार्यकर्ते गजेंद्र गवई यांचे सह भास्कर गवई, रामदास हिवाले, अरुण गवई, सिद्धार्थ गवई, विजय गवई, शशिकांत जाधव , गजु वसन्त गवई, दत्ता गवई , नीलेश गवई, संजय गवई, यांनी विशेष प्रयत्न केलेत.

