प्रांताधिकार्यांना द्यावे लागले स्मरण पत्र
यावल दि.2(सुरेश पाटील) यावल नगर परिषद हद्दीतील विकासक व लेआउट धारक यांनी कोणतेही सुविधा न देता भूखंड विकसित केल्या बाबतचा अहवाल यावल तहसीलदार यांनी गेल्या 6 महिन्यात प्रांताधिकारी यांना न दिल्याने प्रांताधिकारी यांनी दि. 28जानेवारी2022रोजी यावल तहसीलदार महेश पवार यांना स्मरण पत्र देऊन चौकशी अहवाल पुराव्यासह 7 दिवसाच्या आत सादर करण्याचे स्मरण पत्र दिले आहे यामुळे आता यावल तहसीलदार काय कार्यवाही करणार? याकडे संपूर्ण यावल तालुक्याचे लक्ष वेधून आहे.[ads id="ads1"]
याबाबत सविस्तर माहिती अशी की यावल नगरपरिषद हद्दीतील विकासक,लेआउट धारक यांनी कोणत्याही सुविधा उपलब्ध करून न देता भूखंड विकसित करून प्लॉट विक्री करून टाकलेले आहेत यांची चौकशी होऊन कार्यवाही करणेबाबत यावल येथील राजेश कडू महाजन यांनी दि.28/5/2021रोजी उपविभागीय अधिकारी फैजपूर भाग यांच्याकडे लेखी तक्रार केली होती त्यानुसार प्रांताधिकारी यांनी दि.19/7/2021रोजी यावल तहसीलदार यांना चौकशी करून विस्तृत अहवाल पुराव्यासह 7 दिवसात सादर करण्याचे लेखी पत्र दिले होते आणि आहे.[ads id="ads2"]
परंतु गेल्या 6 महिन्यात यावल तहसीलदार महेश पवार यांनी चौकशी करून अहवाल न पाठविल्याने आता पुन्हा दि.28 जानेवारी 2022रोजी स्मरण पत्र देऊन चौकशी अहवाल पुराव्यासह या कार्यालयात 7 दिवसाच्या आज सादर करावा असे स्मरण पत्र दिले त्यामुळे यावल तहसीलदार चौकशी अहवाल पाठविणार आहे किंवा नाही याकडे आता संपूर्ण यावल तालुक्याचे लक्ष वेधून आहे.

