रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) आगामी रावेर सह बाकी नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी सुरु केली असुन येणाऱ्या उन्हाळा हा राजकीय डावपेचाने सुद्धा तापणार असे संकेत मिळत असून रावेर नगरपालीकेत स्थानिक शिवसेना पक्षास आमचे युती साठी प्राधान्य राहील असे प्रहार उत्तर महाराष्ट्र प्रमुख अनिल चौधरी यांनी सांगितले आहे. [ads id="ads1"]
हिंन्दू मुस्लिम व दलित बांधव यांना एकत्रीत करून आता पर्यंत रावेर शहरात जाती-पातीचे आणि द्वेषाचे राजकारण केले आहे. हे संपुष्टात आणून दंगामुक्त, भयमुक्त आणि चौफेर विकासासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या आजच्या पत्रकार परिषदेत करण्यात आली. [ads id="ads2"]
याप्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख अनिल चौधरी, युवक जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, जिल्हाध्यक्ष राजेंद्र महाजन शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील आदींसह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.


