ब्रेन हॅमरेज झालेल्या रावेर येथील ९० वर्षीय रुग्णावर जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 रावेर (सुवर्णदिप वृत्तसेवा) ब्रेन हॅमरेज झालेल्या ९० वर्षीय रुग्णाच्या मेंदूवर जोखमीची लेफ्ट एफटीपी क्रेनियोटॉमी विथ अ‍ॅक्युट ड्युरल हेमॅटॉमा इव्हॅक्युएशन शस्त्रक्रिया डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील मेंदू व मणका तज्ञांच्या अथक प्रयत्नांनी यशस्वी करण्यात आली. रावेर येथील मेहबुब अली या ९० वर्षीय रुग्ण ओट्यावरुन तोल जाऊन खाली पडला.[ads id="ads1"] 

परिणामी मेंदूला जबर दुखापत होवून रक्‍तस्त्रावही झाला आणि रुग्णाची शुद्ध हरपली. तात्काळ नातेवाईकांनी डॉ.उल्हास पाटील रुग्णालय गाठले. यावेळी मेंदू व मणका तज्ञ डॉ.स्वप्नील पाटील यांनी हिस्ट्री जाणून घेत सीटी स्कॅन करण्यास सांगितले. रुग्णाला डाव्या बाजूला ब्रेन हॅमरेज झाल्याचे निदान रिपोर्टवरुन करण्यात आले.[ads id="ads2"] 

   यावर शस्त्रक्रिया हाच पर्याय होता मात्र रुग्णाचे वय जास्त असल्याने जोखीम अधिक होती, नातेवाईकांच्या संमतीने शस्त्रक्रिया करण्यात आली. अशा केसेसमध्ये शस्त्रक्रियेनंतर सक्सेस रेट हा कमी असतो, तरीही जोखीम स्विकारुन डॉ.स्वप्नील पाटील यांनी शस्त्रक्रिया केली. त्यांना निवासी डॉ.शुभम मानकर, डॉ.वरुण देव यांचे सहकार्य लाभले.

मेंदूवरील शस्त्रक्रिया त्यात रुग्णाचे वयही अधिक यामुळे भुलतज्ञांसमोरही मोठे आव्हानही उभे होते. केवळ शस्त्रक्रियेच्या भागापुरतीच भुल देेवून तज्ञांद्वारे शस्त्रक्रिया करण्यात आली.

नातू काय म्हणाला

माझ्या आजोबांचे वय जास्त असल्याने कोणीची उपचारास नकार देत होते. मात्र, येथे आल्यावर त्यांच्यावर ताबडतोब उपचार करण्यात आले. येथील डॉक्टरांमुळे आज माझे आजोबा बरे झाले आहे. मी सर्वांना आवाहन करतो की, पहिल्यांदा येथे या आणि सेवेचा अनुभव घ्या, येथे सर्व जण रुग्णाची काळजी घेतात तसेच नातेवाईकांनाही वेळोवेळी रुग्णाच्या प्रकृतीची माहिती देतात. मी याचा अनुभव घेतला असून आज मी रुग्णालयाचे आभार मानत असल्याची प्रतिक्रिया रुग्णाच्या नातवाने दिली.

वय जास्त, वेळ कमी, जोखीम अधिक

रुग्णाचे वय जास्त होते, त्यात मेंदूला जबर मार बसल्याने रक्‍तस्त्रावही अधिक होता. अशा अवस्थेत रुग्णाला दाखल करुन घेत तात्काळ उपचार सुरु केले. रुग्णाचे वय जास्त असल्याने जोखीम स्विकारत कमी वेळेत शस्त्रक्रिया करणे हे खुप मोठे आव्हान होते. यात रुग्ण व्हेंटीवर जाण्याचीही शक्यता असते. मात्र शस्त्रक्रिया जलद गतीने आणि अचूकरित्या शस्त्रक्रिया पार पडली. असे मत डॉ.स्वप्नील पाटील यांनी व्यक्त केले.


#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!