बोदवड तालुक्यातील उजनी दर्गा हजरत ख्वाजा न्यामतुल्ला शाहवली बाबा संदल मिरवणूक संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


बोदवड (सुवर्ण दिप वृत्तसेवा) शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या न्यामतुल्ला शाहवली बाबांची उजनी दर्गा आहे दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी न्यामतुला बाबांचा येथील बोदवड आखाडा मोहल्ला येथील गुड्डू शाह या खिदमदगाराच्या घरून कपड्याची सजावटीची चादर फुलांची चादर, अत्तर बिर, यासह चंदनाचा लेप याला संदल म्हटले जाते आणि या संदलाची मिरवणूक संपूर्ण शहरातुन प्रभात फेरी मार्गाने घोड्यावरून वाजत गाजत मिरवणूक काढली जाते.[ads id="ads1"] 
   व त्या मिरवणुकीमध्ये नजुमी फकीर (साधू) आपले कर्तब दाखवताना जिभेच्या आरपार, जबड्याच्या आरपार, कानातून, नाकातून, डोळ्यातून, गळ्यातून, मोठमोठ्या सुया आरपार टाकतात व नाचत मिरवणूक मध्ये चालतात यावेळी भक्त त्या सुयाना आपल्या क्षमते नुसार पैश्याच्या नोटा त्या सुयामध्ये वळतात अशी ही मिरवणूक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळुन हा संदल गाडीमधून उजनी येथील न्यामतुल्ला शाहवली बाबांच्या उजनी दर्गा येथे दर्ग्यावर चादर चढवून पूजा अर्चा करून उरुसला सुरुवात होते.[ads id="ads2"] 
   आज अकरा वाजता जिल्ह्यातील सर्व किन्नर समाजाकडून दरवर्षी प्रमाणे मोठया उत्साहात वाजत गाजत मधोहश नृत्य सादर करून बाबांच्या दर्ग्यावर चादर चढवत असतात आणि भाविकांना बोकडाचा जेवण देतात या ठिकाणी मोठ्या उत्साहात दिल्ली, कर्नाटक, गुजरात, मुंबई, मध्यप्रदेश येथून मोठ्या संख्येने भाविक येतात व मोठ्याप्रमाणात बोकडाचा व तांदुळाची गोड व तिखट भात अशी न्याज बनवून वाटली जाते हिंदू मुस्लिम भाविक मोठ्या संख्येने येतात याठिकाणी जिवंत पाण्याचा झरा बाबाच्या दर्ग्याखालून वाहत असतो. हाताने पाणी घेतले जाते कधीच न आटलेला असा जिवंत पाण्याचा झरा नेहमीसाठी येथून वाहतो या पाण्याने भाविक आंघोळ करतात व त्यांघोळीला अत्यन्त महत्व देतात बाबांना उरुसामध्ये चादर, बिर, अत्तर, फुलांची चादर प्रसादामध्ये साखरफुटा ने बत्तासे बारीक चुरलेल्या पोळी त्यात दही गुळ असा मलिदा प्रसाद म्हणून चढवला जातो व वाटला जातो. संदल झाल्यावर दुसऱ्यादिवशी उरुसला सुरुवात होते उरुसामध्ये कव्वाली चा कार्यक्रम ठेवण्यात येतो कवाल्या ऐकण्यासाठी भाविक मोठ्या उत्साहाने येतात पण यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने कव्वालीचा कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!