विवरे येथे शिवजन्मोत्सव निमित्त शिवव्याख्याती भक्ती फर्डे यांचे व्याख्यान संपन्न ; इतिहास ऐकून उपस्थितांचे डोळे पाणावले

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


विवरे ता.रावेर(समाधान गाढे) छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवसाच्या पूर्वसंध्येला श्री राजे शिवाजी महाराज उत्सव समिती आयोजित सोहळ्यामध्ये  शिवव्याख्याती भक्ती फर्डे - विशे यांचा शिवव्याख्यानाचा कार्यक्रम विवरे बु ता. रावेर, जिल्हा. जळगाव येथे आयोजित केला होता.[ads id="ads1"] 

   आपल्या व्याख्यानात त्यांनी शिवजन्म, शिवसंस्कार, मावळ्यांप्रती त्यांची असलेली निष्ठा, आऊसाहेब जिजाबाई व आजची आई, संस्काराचे महत्व ह्या बाबींवर प्रामुख्याने प्रकाश टाकला. आपल्या ओघवत्या वाणीने जमलेल्या जनसमुदायला अक्षरशा खिळवून ठेवले.[ads id="ads2"] 

  अफजलखानाचा कोतला काढल्याचा प्रसंग, नरवीर तानाजी मालुसरे व कोंढाजी, येसाजी कंक,यांच्या शौर्याची कथा मांडत असताना सर्वांच्या अंगावर काटा उभा राहिला होता. दोन तास गर्दीला जागेवर खिळवून ठेवणाऱ्या शहापुर येथून आलेल्या शिवव्याख्याती भक्ती फर्डे यांचा समिती कडून  गौरव करण्यात आला.

      तसेच व्याख्यानाच्या सुरुवातीला शिवश्री ललित पाटील यांनी सुरुवात केली व आपले विचार मांडले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिपप्रज्वलन शिवव्याख्याती भक्ती फर्डे यांच्या हस्ते करण्यास आले त्या सोबत मान्यवर उपस्थित होत

कार्यक्रमाचे अध्यक्ष- शिक्षण विकास मंडळाचे चेअरमन श्री धनजी लढे, पंचायत समिती सदस्य श्री योगेश पाटील, श्रीराम फाउन्डेश पदअधिकारी  घनशाम पाटील, प्रशांत पाटील, योगेश पाटील, विवरे बु सरपंच युनुस तडवी, विवरे खुर्दे सरपंच स्वरा पाटील, ग्रा.प.सदस्य मनिषा पाचपांडे, पुनम बोंडे, निलिमा सनंसे, कविता लोखंडे, ज्योति सपकाळ, राधिका पाटील, निशु पाटील, विपिन राणे, विनोद मोरे, युसुफ खाटीक, दिपक राणे, प्रल्हाद राणे, गोपाळ राणे, सुरेश इंगळे, किशोर पाटील, भिमराव पाटील, योगेश पाटील, दिनेश माळी,कार्यक्रम यशस्वीतेसाठी समिती अध्यक्ष चेतन पाटील, अमोल पाटील, ज्ञानेश्वर पाटील, जिवन बोरनारे, दिपक पाटील, योगेश पाटील, चेतन भागवत पाटील, किरण पाटील, पंकज पाटील, निलेश शिंपी, मिलिंद पाटील, शाम पाटील, सुशील पाटील, पवन पाटील, योगेश चौधरी, भाग्येश महाजन, राहुल पाटील, मयुर चौधरी, तेजस महाजन, देविदास महाजन, योगेश महाजन, नरेन्द्र पाटील, तेजस पाटील, संतोष चौधरी, लोकेश चौधरी,सोनाली पाटील, र्किती पाटील, सुत्रसंचालन  शिवाजी पाटील सर यांनी तर प्रस्ताविक गोपाळ पाटील यांनी केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!