रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) प्रत्येकाच्या आयुष्यात विद्येच्या प्रकाशाबरोबरच मराठी भाषाचा प्रकाश येऊ दे या उद्देशाने मनसेचे अध्यक्ष संदिपसिंह राजपूत यांच्या नेत्तृवाखाली व रावेर तालुका महाराष्टू नवनिर्माण सेनेतर्फे मराठी राजभाषा दिना निमित्त मराठी पुस्तक भेट देऊन रावेर तालुक्यातील ग्रामिण वाड्या वस्त्यांपर्यत मराठी पुस्तकें भेट दिले.[ads id="ads1"]
तरुणांच्या प्रश्नाबरोबरच सामाजिक कार्य करणाऱ्या महाराष्टू नवनिर्माण सेनेने कवी कुसुमाग्रज तथा विष्णु वामन शिरवाडकर यांची जयंती आणि मराठी भाषा गौरव दिनाचे साधुन पुस्तकें भेट देऊन तालुक्यातील दुर्गम भागात जिथे वाचानालये नाहीत अशा ठिकाणी मराठी भाषा गौरव ची माहिती देऊन मनसेचे रावेर तालुका अध्यक्ष संदिपसिंह राजपूत यांच्या हस्ते मराठीतील पुस्तकें भेट दिले गेले.[ads id="ads2"]
यावेळी तालुका उपाध्यक्ष व माजी सरपंच अरुण चौधरी भगिरथ पवार संजय नारखेडे दिनेश गवळी संतोष पावरा छगन भिल दिनेश भिलाला जाने बारेला दिलीप सोनवणे स्वामी चंद्रदेव खर्चेकर ललित राऊत मोहन महाजन जिवन महाजन तुळसिराम पवार सलिम तडवी याकुब तडवी जुम्मा तडवी शकिल मन्यार सलिम शेख यावेळी उपस्थित होते.

