Big Breaking : असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार!

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात AIMIM चे सर्वेसर्वा आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असदुद्दीन ओवेसी हे सध्या प्रचार दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्या गाडीवर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. [ads id="ads2"]  

  गोळीबाराच्या खुणा त्यांच्या गाडीवर दिसून येत आहेत. मात्र, या हल्ल्यात सुदैवानं कुणीही जखमी झालं नाही. “काही वेळापूर्वी छिजारसी टोल गेटवर माझ्या गाडीवर गोळीबार करण्यात आला. 4 राऊंड फायर करण्यात आले. 3 ते 4 लोक होते, सर्वजण पळून गेले आणि शस्त्र तिथेच सोडून गेले. माझी गाडी पंक्चर झाली, मात्र मी दुसऱ्या गाडीत बसून तिथून निघालो. आम्ही सर्वजण सुखरुप आहोत”, असं ट्वीट ओवेसी यांनी केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी गोळीबाराच्या खुणा असलेला गाडीचा फोटोही शेअर केला आहे.


#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!