नायगाव येथे पंतप्रधान आवास योजनेत ( ड यादी ) पात्र लाभार्थ्यांना डावलवुन अपात्र लाभार्थ्यांना घरकुल मंजुर

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

ग्रामस्थांची बिडीओकडे तक्रार

यावल दि.1(सुरेश पाटील)तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायती अंतर्गत गावासाठी मंजुर करण्यात आलेली पंतप्रधान आवास योजना ( ड यादी ) ही चुकीच्या निकषावर करण्यात  आलेली असुन , खरे लाभार्थ्यांना या यादीतुन वगळण्यात आले असुन त्यांचा तात्काळ पंतप्रधान आवास योजनेच्या यादी समावेश करण्यात यावा अशी मागणीचे निवेदन असंख्य ग्रामस्थांच्या वतीने गटविकास अधिकारी नेहा भोसले यांना देण्यात आले आहे.       [ads id="ads1"]                                 

   या संदर्भात यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी नेहा भोसले यांना  देण्यात आलेल्या लिखित तक्रार निवेदनात नायगाव ग्रामस्थांनी म्हटले आहे की , नायगाव ग्राम पंचामतच्या वतीने दिनांक १ मे२०१६ रोजी पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळावा या साठी गावातील लाभार्थ्यांचा सर्वे करून एकुण ४३६घरकुलच्या पात्र लाभार्थ्यांची यादी मंजुर करण्यात आली होती.[ads id="ads2"] 

  परन्तु दिनांक २८ जानेवारीच्या झालेल्या ग्रामसभेत एकुण २०२ घरकुल मंजुर करण्यात आले असल्याची माहीती समोर आली असुन , यातील २३४ पात्र लाभार्थ्यांची नांवे मात्र प्रतिक्षा यादी ठेवण्यात आल्याने गावात ग्रामस्थांमध्ये प्रचंड असे नाराजीचे वातावरण पसरले आहे . या निवेदनात ग्रामस्थांनी म्हटले आहे की , सदरची मंजुर झालेली घरकुलांच्या यादीत जे खरे व पात्र व लाभार्थी आहेत त्यांची कच्ची , कुळाची घरे , झोपडी अशी घरे आहेत त्यांच्या घरांना सर्वेक्षणात घरकुल पक्की टु रूम किचन अशी पक्की घरे असल्याचे दर्शविण्यात आली असुन , ज्यांची पक्की घरे आहेत अशांना लाभार्थी दाखण्यात आली असुन , त्यांची घरकुल मंजुर मंजुर करण्यात आली आहे . पंतप्रधान आवास योजने अंतर्गत खरे लाभार्थ्याना डावण्यात आले असल्याने गरजु लाभार्थ्यांवर हा अन्याय होत असल्याने तात्काळ २३४ पात्र व खरे विधवा , अपंग आणी बेघर तसेच कच्ची घरे असलेल्या लाभार्थ्यांंचे नांव समाविष्ठ करण्यात यावे व वशिलेबाजीने मंजुर करण्यात आलेल्या घरकुल लाभार्थ्यांंची तात्काळ चौकशी करण्यात यावी व गावातील पात्र घरकुल लाभार्थ्यांवरील झालेला अन्याय दुर करावा तसे न झाल्यास सर्व ग्रामस्थ आपल्या पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा ईशारा देण्यात आला असुन , यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी नेहा भोसले यांना देण्यात आलेल्या निवेदनावर मुस्तफा हैदर तडवी , विनोद बाबु तडवी , लुकमान महारू तडवी , सुभान इमाम तडवी , छबु खुदयारखा तडवी, फकीरा सुभान तडवी, सिकंदर ईमाम तडवी, राबीया राजु तडवी, हमीद ईकबाल तडवी , रशीद निजाम तडवी , फिरोज कलींदर तडवी , निजाम बक्षु तडवी आदीच्या स्वाक्षरी आहेत .

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!