रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर येथील माजी जिल्हा परिषद सदस्या यांचे पती काँग्रेसचे सुरेश चिंधू पाटील यांनी रावेर विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांच्या कार्यपद्धतीवर उघडपणे नाराजी व्यक्त करून दिनांक 22/02/2022रोजी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला आहे.[ads id="ads1"]
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राज्यमंत्री बच्चु कडु व प्रहारचे जळगाव जिल्हाध्यक्ष अनिल चौधरी यांच्या उपस्थितीत सुरेश चिंधू पाटील व रावेर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र रामदास महाजन यांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला आहे.[ads id="ads2"]
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राज्यमंत्री बच्चु कडु यांच्या कार्यावर विश्वास ठेऊन प्रहार जनशक्ती पक्षाची शेतकरी हित असलेली भूमिका, सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी व प्रहार जनशक्ती पक्षाच्या विचारधारा यावर प्रभावित होऊन सुरेश चिंधु पाटील व रावेर येथील नगरसेवक राजेंद्र रामदास महाजन यांनी राज्यमंत्री बच्चु कडु यांच्या उपस्थितीत दिनांक 22/02/2022 रोजी प्रवेश केला यावेळी राज्यमंत्री बच्चू कडू व प्रहारचे जळगाव जिल्हाध्यक्ष अनिल चौधरी व कार्यकर्ते उपस्थित होते. सुरेश पाटील व राजेंद्र महाजन यांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश करून रावेर तालुक्यातील शेतकरी बांधवांचे प्रश्न, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविणार असल्याचे सुरेश पाटील यांनी "सुवर्ण दिप न्युज," शी बोलतांना सांगितले.

