Crime : किनगाव येथील तरूणाशी लग्न करून पैसे घेवून पसार झालेल्या नववधूला पोलीसांनी केली अटक

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल तालुक्‍यातील किनगाव (Kingaon)  येथील तरुणाकडून पैसे घेत लग्न करून फसवणूक करणार्‍या फरार असलेल्या नववधूला यावल पोलिसांनी (Yawal Police) अटक केली आहे. शनिवारी ५ फेब्रुवारी (5February) रोजी दुपारी यावल न्यायालयात (Yawal Court)  हजर केले असता न्या. एस एम बनचरे यांनी मंगळवार ८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. [ads id="ads1"] 

यावल (Yawal) तालुक्यातील किनगाव (Kingaon) येथील रहिवाशी धनंजय हिरालाल सोनार या तरूणाचा यशवंत उर्फ दादू विजय पाटील रा. सांगली खुर्द यांची मानलेली बहीण सरिता प्रकाश कोळी रा. अंजाळे (Anjale) हिच्यासोबत विवाह निश्चित झाला होता. [ads id="ads2"] 

  या विवाहासाठी सव्वा लाख रुपये द्यावे तसेच लग्नाचा खर्च मुलाने करावा असे ठरवण्यात आले होते. त्याप्रमाणे ८५ हजार रुपयांची रोकड देण्यात आली होती, उर्वरित रक्कम नंतर देणार होते.  १४ डिसेंबर २०२१ रोजी देहू आळंदी पुणे (Pune) येथील अलंकापुरी (Alankapuri)  मंगल कार्यालय पुणे येथे लग्न देखील पार पडले. लग्नाच्या सात दिवसानंतर यशवंत उर्फ दादू विजय पाटील किनगाव येथे आला व नववधू सरिता कोळी हिला तिच्या आईच्या भेटीसाठी मी घेऊन जात आहे असे सांगून घेऊन गेला तर परत आलाच नाही. सर्वत्र शोधाशोध करून देखील नववधू आणि तिचा मानलेला भाऊ मिळून न आल्यामुळे आपली फसवणूक झाल्याची सोनार यांच्या लक्षात आले. 

हेही वाचा :- यावल तालुक्यात निकृष्ट कामांचा धूम धडाका ; वरिष्ठ अधिकाऱ्यांसह खासदार आमदार यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष 

सोनार यांनी यावल पोलीस (Yawal Police) ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शुक्रवारी ४ फेब्रुवारी रोजी यावल पोलीसात दोघांवर गुन्हा  (Crime) दाखल करण्यात आला होता. संशयित आरोपी नववधू सरिता हिला पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी ५ फेब्रुवारी रोजी दुपारी न्यायालयात प्रथम वर्ग न्यायमुर्ती एन.एच. बनचरे यांच्यासमोर हजर केले असता तिला मंगळवार ८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.  पुढील तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील (PI Sudhir Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार करीत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!