५ हजाराची लाच स्विकारणाऱ्या यावल तालुक्यातील मालोद येथील कोतवालासह एका पंटरला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



यावल (सुवर्ण दिप वृत्तसेवा) 
यावल तालुक्यातील सावखेडा (Savkheda) येथील शेतावरील सातबारा (7/12Utara)  उताऱ्यावर नाव कमी करून देण्याच्या मोबदल्यात ५ हजाराची लाच स्विकारणाऱ्या कोतवालासह एका पंटरला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.याबाबत यावल पोलीसात (Yawal Police) गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
[ads id="ads1"] 

याबाबत माहिती अशी की, तक्रारदार यांचे यावल तालुक्यातील सावखेडासिम (Savkhedasim) शिवारात शेत आहे. शेतजमीनीचे सातबारा उताऱ्यावरील इतर अधिकार नोंद मधील तक्रारदार यांची बहिण यांचे नाव मंडळाधिकारी किनगाव (KingaonvCircle) यांच्याकडून कमी करण्याची विनंती Yawal तालुक्यातील मालोद तलाठी कार्यालयातील (Malod Talathi Office) कोतवाल जहाँगीर बहादूर तडवी (वय-५६) रा. मालोद ता. यावल जि.जळगाव यांच्याकडे केली.[ads id="ads2"] 

   त्यानुसार सातबारा उताऱ्यावरील (7/12 Utara) नाव कमी करण्याच्या मोबदल्यात ५ हजाराची मागणी केली. त्यानुसार मंगळवारी Yawal तालुक्यातील किनगाव (Kingaon) येथील जनरल स्टोअर्स जवळी कोतवाल जहाँगीर तडवी यांच्या सांगण्यावरून दुकानदार मनोहर दयाराम महाजन (वय-४५) रा. किनगाव ता. यावल (Kingaon Taluka Yawal) याने तक्रारदार यांच्याकडून ५ हजाराची लाचेची रक्कम स्विकारली. त्यावेळी लाचलुपपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून दोघांना कारवाईसाठी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी यावल पोलीसात (Yawal Police) गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!