सांगवी येथील घटनेच्या निषेधार्थ आदिवासी संघर्ष समिती व आदिवासी कोळी समाजाच्या वतीने विविध ठिकाणी निवेदने

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

रावेर तालुका प्रतिनिधी (राजेश वसंत रायमळे )

सांगवी ता.यावल घटनेच्या निषेधार्थ आदिवासी संघर्ष समिती तसेच आदिवासी कोळी समाज बांधवांच्या वतीने नुकतेच विविध ठिकाणी कार्यालयांमध्ये निवेदने देण्यात आलीत.[ads id="ads1"] 

याबाबत सविस्तर वृत्त असे की,नुकतेच दि.३१/०१/२०२२रोजी २६ जानेवारी ला झालेल्या सांगवी ता. यावल (Yawal) येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराच्या तीव्र निषेध म्हणून तहसील कार्यालय रावेर(Raver Tahsil Office) प्रांताधिकारी फैजपूर (SDO Faijpur) उपअधीक्षक फैजपूर, सावदा पो. स्टे. तहसिल मुक्ताईनगर (Muktainagar) व मा.आमदार चंद्रकांत पाटील यांनाआदिवासीं कोळी महासंघ जिल्हा आदिवासीं संघर्ष समिति व तालुका कार्यकरिणी व आदिवासीं कोळी समाज बांधव च्या वतीने निवेदन देण्यात आले.[ads id="ads2"] 

   यावेळी आरोपींना पोस्को (Posco) आणि शक्ती कायद्याने फाशीची शिक्षा झाली पाहिजे तसेच मनोधैर्य योजनेतून तरुणीला समाजात मानाने जगता यावे यासाठी आर्थिक मदत मिळावी निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी युवा पिढीतील रणरागिणी म्हणून शालेय शिक्षण घेत असलेल्या मुलींनी स्रियांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध त्रिव्र संताप व्यक्त केला अशा नराधमांना तात्काळ फाशी दिली गेली पाहिजे अशी मागणी केली. त्यावेळी जिल्हाध्यक्ष सुभाष सपकाळे, जिल्हा मार्गदर्शक गंभीर उन्हाळॆ,जिल्हा सल्लागार चंद्रकांत कोळी, जिल्हा सरचिटणीस विश्वनाथ कोळी,प.स.सदस्य रुपाली कोळी,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विनोद कोळी,संघर्ष स.महिला आ.जिल्हाध्यक्ष सुनिता तायडे, आ. कोळी समाज ता. अध्यक्ष नारायण तायडे, आ. को. स. ता. अध्यक्ष मनोहर कोळी, आ. स. समिती ता. अध्यक्ष चंद्रकांत कोळी, आ. को.म.युवाअध्यक्ष दिलीप कोळी,महिला ता.अध्यक्ष सविता कोळी, आदिवासी कोळी समाज ता. उपाध्यक्ष नितीन कोळी सर, ता. उपाध्यक्ष सपना कोळी,रोहिणी तायडे, काजल तायडे,साक्षी कोळी,माधुरी सपकाळे,सुपडु कोळी, ता.युवा संघटक ईश्वर कोळी, ता. संघटक किशोर कोळी, तुषार कोळी उपसरपंच, प्रविण सपकाळे, पृथ्वी जैतकर,गोपाळ कोळी, आनंदा सपकाळे, भगवान कोळी,नितेश कोळी,विनोद कोळी पंडित कोळी, मनोज वाघ, भागवत कोळी, बंटी कोळी आदी समाज बांधव उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!