प्रा. डॉ. रेखा पाटील यांनी आपल्या वक्तव्यातून असे सांगितले की, “मराठी भाषा गौरव दिन’ हा कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. वि. वा. शिरवाडकर हे सुप्रसिद्ध नाटककार होते, त्याचप्रमाणे कवी म्हणून काव्यलेखन करीत असताना कुसुमाग्रज हे टोपण नाव त्यांनी स्वीकारले.[ads id="ads2"]
कुसुम नावाची त्याची लहान बहीण होती आणि या कुसुमचे मोठे भाऊ म्हणजेच कुसुमाग्रज होत. १९८७ साली त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. वि. वा. शिरवाडकर यांच्या कार्यकर्तृत्वाविषयीची माहिती प्रा. डॉ. रेखा पाटील यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिली. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. सतीश वैष्णव यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस. पी. उमरीवाड यांनी केले. त्याचप्रमाणे ग्रंथपाल संदीप साळुंके यांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कुसुमाग्रजांची ‘कणा’ ही कविता सादर केली.
डॉ.विनोद रामटेके यांनी बालवर्गात शिकलेली कविता म्हणून दाखवली. प्रा. डॉ. नीता वाणी यांनी कवी कुसुमाग्रज यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त कले. सदर कार्यक्रमाचे आभार प्रा. डॉ. पी.आर. गवळी यांनी मानले. कार्यक्रमाला ११८ विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मराठी भाषा गौरव दिनाचा कार्यक्रम प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.

