रावेर येथे राष्ट्रसंत गाडगेबाबांना जयंतीनिमित्त रमाई मंडळा तर्फे अभिवादन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 रावेर बुद्ध विहार

रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) - येथिल माता रमाई महिला मंडळा तर्फे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. सावदा रोडवरील तक्षशिला बुद्ध विहारात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला मंगला दामोदरे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला तर चंद्रप्रभा गजरे यांचे हस्ते पूजन करण्यात आले. [ads id="ads1"] 

यावेळी रावेर नगरपालिकेच्या नगरसेविका व जळगांव जिल्हा महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा रंजना गजरे यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की गाडगे बाबांनी समाज सुधारण्यासाठी व जागृती निर्माण करणेसाठी अहोरात्र परिश्रम घेतले .[ads id="ads2"] 

  कीर्तनाचे माध्यमातून त्यांनी आदर्श जीवन जगण्याचा मार्ग दिला आजही त्यांचे विचार आपल्याला जीवनात मार्गदर्शक आहेत त्यांच्या विचारांचे अनुकरण करणे काळाची गरज आहे. कार्यक्रमास गौतमा गजरे, निर्मला तायडे, प्रमिला लोंढे, सुमन कोंघे, विजया महाजन, अंजना महाजन,प्रियंका जगताप आदी महिला उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती तायडे यांनी केले तर आभार मंगला दामोदरे यांनी मानले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!