धरणगाव प्रतिनिधी - पी.डी.पाटील सर
धरणगाव - दि. २३ फेब्रुवारी, २०२२ बुधवार रोजी मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांविरोधात धरणगाव शहरातील सर्व पक्षीय राजकीय, सामाजिक संघटनांच्यावतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. मूक मोर्चा रॅलीची सुरुवात बालाजी मंदिरापासून करण्यात आली. यानंतर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले स्मारक - कोट बाजार - परीहार चौक - रॅलीचा समारोप कुळवाडी भूषण - बहुजन प्रतिपालक - छत्रपती शिवराय स्मारकाजवळ करण्यात आला. या मूकमोर्चा रॅलीमध्ये धरणगाव शहरातील माता - भगिनी, सर्वपक्षीय मान्यवर, समस्त धरणगावातील सुजाण नागरिक,युवक - युवती, शाळेचे विद्यार्थी -विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.[ads id="ads1"]
सविस्तर वृत्त असे की २० फेब्रुवारी रोजी एका ६२ वयाच्या माणसाने ६ व ८ वर्षाच्या मुलींवर अत्याचार केला. त्याच्या निषेधार्थ या मोर्चाचे आयोजन केले होते. या मूक मोर्चा चे प्रास्ताविक धरणगाव शहरातील युवती प्रांजल सुनील चौधरी हिने केले. प्राजंलने मनोगतात मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी असे मत व्यक्त केले.[ads id="ads2"]
यानंतर धरणगांव महाविद्यालयाच्या प्रा.कविता महाजन, माजी नगराध्यक्ष उषाताई वाघ, गुड शेफर्ड शाळेच्या माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका नाजनीन शेख, लिटल ब्लाझम शाळेच्या प्राचार्य ज्योती जाधव, माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पाताई महाजन यांनी सर्व माता - भगिनी यांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. मनोगतात या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. शासनाला विनंती करून हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा व सरकारी वकील उज्ज्वल निकम साहेब यांच्याकडे खटला सादर करावा आणि मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. पुरोगामी महाराष्ट्रात छत्रपती शिवराय - फुले - शाहू आंबेडकर यांच्या राज्यात अशी घटना घडणे निंदनीय आहे. मुलींचा सन्मान करा. " बेटी बचाव - बेटी पढाव " असा शिक्षणाचा आपण नारा देतो. आणि याच मुलींवर अशा घटना घडत असतील तर ते अतिशय वेदनादायक आहे. असे प्रतिपादन या सर्व विचारपिठावरील महिला मान्यवरांनी केले.
या घटनेच्या निषेधार्थ धरणगाव शहरातील विचार मंचावर उपस्थित सर्व महिला व मुलींच्या हस्ते पोलीस प्रशासनाचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके साहेब व तहसिलदार लक्ष्मण सातपुते साहेब यांना निवेदन देण्यात आले. शेळके साहेब यांनी मनोगतात या नराधमांना कठोरातील कठोर शिक्षा होईल आपल्या सर्वांची मागणी मी वरील प्रशासनापर्यंत पोहोचू. मनोधैर्य योजनेचा लाभ या मुलींना मिळवून देऊ असे प्रतिपादन केले. आपण सर्वांनी शांततेत मूक मोर्चा चे आयोजन केले सर्व धरणगावकरांचे अभिनंदन केले.
मूक मोर्चा च्या सभेच्या समारोपाप्रसंगी अनेक सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, व्यापार क्षेत्रातील मान्यवरांनी या दोघ पीडित मुलींची शैक्षणिक जबाबदारी घेऊन त्यांच्या कुटुंबाला शक्य तेवढी मदत केली जाईल. असे आश्वासन देण्यात आले. या मोर्चात हजारोच्या संख्येने माता-भगिनींनी सहभाग नोंदवला.

