रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर नगरपालिकेच्या नगरसेविका सौ. रंजना योगेश गजरे यांची जळगांव जिल्हा महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली.[ads id="ads1"]
आज Raver येथिल सौ. कमलाबाई अग्रवाल गर्ल्स हायस्कूल मध्ये आयोजित डिजिटल सदस्य नोंदणी प्रशिक्षण शिबिरात रावेर विधानसभा मतदार संघाचे आमदार शिरीषदादा चौधरी (MLA Shirish Chaudhari) यांचे हस्ते व जळगांव जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा पवार, माजी खासदार डॉ उल्हास पाटील, जळगांव जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ. सुलोचनाताई वाघ यांचे उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.[ads id="ads2"]
यावेळी जिल्हा सरचिटणीस जमिल शेख, अनुसूचित जाती काँग्रेस विभाग जिल्हा कार्याध्यक्ष राजू सवर्णे, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, आदिवासी काँग्रेसचे दिलरुबाब तडवी, विनायक महाजन, प्रकाश सुरदास, ऍड. योगेश गजरे,मानसी पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

