राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्त रावेर मध्ये  भव्य जिल्हास्तरीय  आमदार चषक स्पर्धा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक,रावेर येथुन कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. शिरीष चौधरी (MLA Shirish Chaudhari) यांच्या हस्ते झेंडा दाखवुन सुरुवात करण्यात आली.[ads id="ads1"] 

  डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक (Dr.Babasaheb Ambedkar Chauk Raver) ते हजरत जंगलीपीर बाबा (Hajrat Jungli Peer Baba) यांच्या दर्गापर्यंत 10 कि.मी. पर्यंत रनिंग स्पर्धा पार पडली. त्यामध्ये इंदौर (Indore) येथील नवीन महेश चव्हाण प्रथम विजेता यास आ . शिरीषदादा चौधरी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह,प्रमाणपत्र,आणि रोख रक्कम देवुन गौरविण्यात आले.[ads id="ads2"] 

   द्वितीय राहुल मोतीराम साबळे यास कार्यक्रमाचे उद्‌घाटक दारामोहम्मद जफर मोहम्मद यांनी तर तृतिय अल्लाउद्दीन याकुब तडवी यास राजेंद्र चौधरी यांचे हस्ते देण्यात आले . या स्पर्धेला इंदौर,महू, येथुन 70 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.  आ शिरीषदादा चौधरी (MLA Shirish Chaudhari) यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले . याप्रसंगी आ . शिरीषदादा चौधरी यांनी विजेते स्पर्धेक यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देवुन सत्कार केला.कार्यक्रमाचे आयोजन सावन मेढे, धुमा मेढे , संतोष पाटील यांनी केले होते. सूत्रसंचालन प्रा.संदीप धापसे व प्रदीप सपकाळे यांनी तर उपस्थितांचे आभार संघरत्न दामोदरे यांनी मांडले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!