मुक्ताईनगर प्रतिनिधी (समाधान गाढे ) दुचाकीने (Two Wheeler) झाडाला धडक दिल्याने अपघात होऊन त्यात राजू नीना इंगळे (वय ४५, रा. चिंचखेडेसीम, ता. बोदवड) यांचा जागीच मृत्यू झाला. [ads id="ads1"]
मयत राजू इंगळे ४ रोजी रात्री साडे दहाला मुक्ताईनगर (Muktainagar) रस्त्यावर नाडगाव (Nadgaon) दरम्यान ही घटना घडली. चिंचखेडसीम येथील राजू नीना इंगळे हे दि. ४ रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास बोदवडहून चिंचखेड (Chinchkhed) येथे घरी जात होते.[ads id="ads2"]
बोदवडपासून तीन कि. मी. अंतरावर मुक्ताईनगर (Muktainagar) रस्त्यावर नाडगाव (Nadgaon) दरम्यान असलेल्या घाटीवर निंबाच्या झाडाला त्यांच्या दुचाकीने धडक दिली. या अपघातात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना मध्यरात्री उघडकीस आली.राजू इंगळे (Raju Ingale) यांच्या पश्चात पत्नी, चार मुली व एक मुलगा असा परिवार आहे. या घटनेने परिसरात हळहळ होत आहे.