अशोक वामन भंगाळे वय 56 रा. लक्ष्मीनारायण नगर भुसावळ (मूळ रहिवासी आमोदा ता. यावल) हे रेशनदुकानावर सेल्समन म्हणून काम करायचे त्याचं नेहमी आमोदा (Aamoda) या गावी येणं-जाणं असायचं दरम्यान सोमवारी ते दुचाकी घेऊन आमोदा (Aamoda) येथे जाण्या करीता घरून निघाले होते. सायंकाळ झाली मात्र ते घरी आले नाही म्हणून त्यांच्या कुटुंबाकडून त्यांच्या मोबाईलवर कॉल करण्यात आला मात्र, कॉल एका वेगळ्याच इसमाने उचलला आणी दुचकीच्या डक्कीत मोबाईल सोडून व्यक्ती गेली कुठे असे शोधतांना विहिरीत अशोक भंगाळे यांचा मृतदेह आढळून आला. [ads id="ads2"]
तेव्हा संबधीतांनी कुटुंबासह फैजपूर पोलिसांना याबाबत माहिती दिली तेव्हा तातळीने फैजपूरचे सहायक पोलिस निरीक्षक (फैजपूर पोलिस Station API) सिद्धेश्वर आखेगावकर, पोलीस उपनिरीक्षक मोहन लोखंडे, सहायक फौजदार हेमंत सांगळे, अरूण नमायते, महेश वंजारी हे घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी मृतदेह काढून रात्री साडेनऊ वाजता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणला येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. बी. बारेला (Medical Officer Dr. B B Barela) यांनी शवविच्छेदन करीत मृतदेह नातलगांना सोपवला व रात्रीचं मयत यांच्यावर आमोदा येथे अंतसंस्कार करण्यात आले या प्रकरणी फैजपुर पोलीसात (Faijpur Police) भरत भंगाळे यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत भंगाळे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे



